SBI Alert | स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

अनोळखी व्यक्तीनं पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करु नका, असं आवाहन बँकेने केले आहे. SBI Alert qr code fraud

SBI Alert | स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 11:49 AM

नवी दिल्ली: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी अ‌ॅलर्ट जारी केला आहे. स्टेट बँकेने ट्विट करुन ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही क्यूआर कोड (QR Code) स्कॅन केल्यानंतर पैसे मिळत नाहीत त्यामुळे दुसऱ्या किंवा अनोळखी व्यक्तीनं पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करु नका, असं आवाहन बँकेने केले आहे. जर, चुकुनही तुम्ही कोड स्कॅन केला तर तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे जाऊ शकतात. कोरोना काळात ग्राहकांकडून ऑनलाईन बँकिंगचा वापर वाढल्यानं फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं असून बँकेकडे विविध तक्रारी प्राप्त होतात. (State Bank of India issue alert regarding qr code fraud appeal to customers don’t share details to anyone)

संशय आल्यास बँकेशी संपर्क साधा

ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे किंवा फसवणुकीचा संशय आल्यास थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि त्याबाबतत माहिती द्यावी. फसवणूक होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या मेसेज पासून सावधनाता बाळगणं आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचं ट्विट

QR कोडद्वारे अशी होते फसवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियानं क्यू आर कोडद्वारे कशी फसवणूक होते हे समजावून सांगण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे क्यू आर कोड पाठवतात आणि पैसे उकळातात हे समजावून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण ज्यावेळी दुसऱ्याचा क्यू आर कोड स्कॅन करतो तो पैसे पाठवण्यासाठी असतो. आपण स्वत: क्यू आर कोड स्कॅन केल्यास पैसे स्वीकारण्याले जात नाहीत तर ते आपल्या खात्यातून जातात.

खासगी माहिती सार्वजनिक करु नका

एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, Mr. Thinkeshwar हे त्यांची खासगी माहिती नेहमी गुप्त ठेवतात. कोणतीही खासगी माहिती इतरांना देतेवेळी ते दोनदा विचार करतात. तसेच जर अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास कृपया https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

ही माहिती शेअर करु नका

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.

संबंधित बातम्या:

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

SBI चा ग्राहकांना इशारा, ‘ही’ माहिती शेअर करताना करा विचार, अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे होतील गायब

(State Bank of India issue alert regarding qr code fraud appeal to customers don’t share details to anyone)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.