SBI ची भन्नाट योजना, मुदत ठेवीतील पैसे ATM मधून काढता येणार, वाचा सविस्तर

SBI नं त्यांच्या मुदत ठेव ग्राहकांना दिलासा देणारी एक योजना जाहीर केलीय. SBI Multi Option Deposit Scheme

SBI ची भन्नाट योजना, मुदत ठेवीतील पैसे ATM मधून काढता येणार, वाचा सविस्तर
SBI बँकेची डिजिटल सेवा बंद राहणार
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 10:40 AM

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संसर्ग, लॉकडाऊन यामुळे अनेकांचं आर्थिक गणित बिघडलंय. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या मदतीला धावून आली आहे. SBI नं त्यांच्या मुदत ठेव ग्राहकांना दिलासा देणारी एक योजना जाहीर केलीय. मुदत ठेव ग्राहकांना त्यांची ठेव पावती न मोडता देखील पैसे काढता येणार आहेत. स्टेट बँकेने या योजनेला मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम असं नाव दिलं आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. (State Bank of India launch SBI Multi Option Deposit Scheme customer can withdraw fixed deposit amount from ATM)

सेव्हिंग्ज आणि चालू खात्याशी संलग्नित

मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम ही एका प्रकारची टर्म डिपॉझिट स्कीम आहे. हे तुमच्या बचत आणि चालू खात्याशी संलग्नित आहे. एखाद्या ग्राहकाला त्याच्या बचत आणि चालू खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण त्यामध्ये रक्कम शिल्लक नसेल तर त्यावेळी मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम या योजनेतील गुंतवणुकीवर मुदत ठेवींवर जितकं व्याज दिलं जाते तेवढेच मिळते.

किती रक्कम जमा करायची?

स्टेट बँकेच्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही 10 हजारांची गुंतवणूक करु शकता. याशिवाय ठेव ठेवल्यानंतर दरमहा 1 हजार रुपये देखील जमा करु शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही.

योजनेची वैशिष्ट्ये

>> SBI MODS 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी काढता येते. ठेवीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढता येते. >> MODS मध्ये कर्ज आणि नामांकन सुविधा असून स्टेट बँकेच्या दुसऱ्या शाखेत वर्ग करता येते. >> MOD शी लिंक केलेल्या बचत आणि चालू खात्यामध्ये किमान रक्कम ठेवणं आवश्यक आहे. >> एमओडी मोडताना काढली गेलेली रक्कम जितका कालवाधी खात्यावर असेल तेवढ्याकाळाच्या व्याजावर दंडव्याज लावून रक्कम दिली जाईल. उर्वरित रक्कमेवर मूळ दरानं व्याज दिलं जाईल.

संबंधित बातम्या:

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आधी सरकारचा निर्णय, आता SBI कडून स्वस्तात गृहकर्ज

(State Bank of India launch SBI Multi Option Deposit Scheme customer can withdraw fixed deposit amount from ATM)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.