SBIची नवी योजना, एफडीतून मिळणार दुप्पट लाभ! 5 हजार रुपयांपासून करु शकता सुरुवात

SBI म्युचुअल फंडने रिटायरमेंट बेनिफिट फंड लॉन्च केलं आहे. या नव्या योजनेत 3 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

SBIची नवी योजना, एफडीतून मिळणार दुप्पट लाभ! 5 हजार रुपयांपासून करु शकता सुरुवात
त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने 75 दिवसांसाठी 4.45 टक्के, 525 दिवसांसाठी 5.60 टक्के व्याजाची घोषणा केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2250 दिवसांची कोणतीही अतिरिक्त व्याज योजना नाही.
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 10:33 PM

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. SBI म्युचुअल फंडने रिटायरमेंट बेनिफिट फंड लॉन्च केला आहे. निवृत्तीसाठी बचत करु इच्छिणारे प्रोफेश्नल आणि पगार नसलेले लोक SBI म्यूचुअल फंड योजनेतून मोठा लाभ मिळवू शकतात. या नव्या योजनेत 3 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. SBI रिटायरमेंट बेनिफिट फंड एक उत्तम फंड आहे. रिस्क प्रोफाईलमध्ये हा फंड 4 योजना ऑफर करतो. या योजनेत SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 50 लाख रुपयांपर्यंतचा टर्म इन्स्युरन्श कव्हरही दिलं जातं. SBIच्या या नव्या फंड ऑफरमध्ये अजून अनेक फायदे आहेत. त्यात डिव्हिडंट ऑप्शनमध्ये SWPची सुविधा आणि तिमाही आधारावर विड्रॉव्हलच्या सुविधेचा समावेश आहे.(State Bank of India’s new scheme that offers more benefits than FD)

SBIची रिटायरमेंट बेनिफिट फंड योजना काय आहे?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक एनएफओ म्हणजे न्यू फंड ऑफर आहे. या योजनेचं नाव SBI रिटायरमेंट बेनिफिट फंड सोल्युशन ओरिएंटेड स्कीम असं आहे. यात 3 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवणूकदार कमीत कमी 5 हजार रुपयांपासून याची सुरुवात करु शकतो. एनएफओ ही एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची नवी योजना असते. या द्वारे एखादी म्यूचुअल फंड कंपनी शेअर्स, सरकारी बॉन्ड अशा प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते.

या योजनेत पैसे गुंतवल्यास फायदा काय?

> SBI म्यूचुअल फंडने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे मॅनेजमेंट गौरव मेहता, दिनेश आहूजा आणि मोहित जैन हे तिघे मिळून करतील.

>> हा फंड चार गुंतवणूक प्लॅन ऑफर करतो. यात अॅग्रेसिव्ह (शेअर बाजारावर आधारित), अॅग्रेसिव्ह हायब्रिड (शेअर बाजारावर आधारित), कंजर्व्हेशन हायब्रिड (बॉन्ड्सवर आधारित) आणि कंजर्व्हेटीव्ह (बॉन्सवर आधारित) प्लॅन आहेत.

>>शेअर बाजार आणि बॉन्ड मार्केट वगळता प्रत्येक प्लॅनमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 20 टक्क्यांपर्यंत, REIT/InVIT मध्ये 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची तयारी आहे

>> तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार म्यूचुअल फंडमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना इथं एफडीपेक्षा जास्त परतावा मिळेल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्यूचुअल फंडमध्ये वर्षाला कमीतकमी 10 टक्क्यांपर्यंतचा फायदा होतो. तर एफडीवर वर्षाला फक्त 5 टक्के परतावा मिळतो.

संबंधित बातम्या : 

SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, आता घर बसल्या मिळणार ‘या’ 9 सुविधांचा लाभ

‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

State Bank of India’s new scheme that offers more benefits than FD

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.