Maharashtra Budget 2024 : काऊंटडाऊन सुरू… काही क्षणातच राज्याचा अर्थसंकल्प; कुठे पाहाल बजेट?

State Budget 2024 Live : महायुती सरकारचे अंतरिम बजेट अगदी काही क्षणात समोर येईल. त्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या अर्थसंकल्पाची अपडेट तुम्हाला येथे पाहता येईल. लाईव्ह बजेटसह सगळ्या अपडेट एकाच ठिकाणी पाहता येतील.

Maharashtra Budget 2024 : काऊंटडाऊन सुरू... काही क्षणातच राज्याचा अर्थसंकल्प; कुठे पाहाल बजेट?
येथे पाहा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 1:58 PM

महायुती सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये राज्यातील जनतेसाठी काय खास असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज शुक्रवारी सादर होत आहे. पावसाळी अधिवेशनात सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घोषणांचा पाऊस पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्‍यांच्या पोतडीतून जनतेच्या पदरात काय पडते, याची सुद्धा चर्चा आहे. लोकसभा निवडमुकीतील हाराकिरी आणि विधानसभा खिशात घालण्यासाठी राज्य सरकार मोठ्या घोषणा करणार हे तर निश्चित आहे. राज्यातील मोठ्या वर्गाला आपलंस करण्यासाठी खास योजना आणण्यात येतील असे दिसते. राज्यातील जनतेला या अंतरिम बजेटची सगळी अपडेट या ठिकाणी पाहता येईल.

काय आहे अर्थमंत्र्यांच्या पतोडीत?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचे अंतरिम बजेट सादर करतील. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून तर शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घोषणांचा पाऊस न पाडता ठोस काही मिळण्याची अपेक्षा आहे. अल्प व मध्यम शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज, महिलांसाठी लाडली दीदी योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, सध्या राज्यात गाजत असलेल्या ओबीसी-मराठा आरक्षणावरुन दोन्ही समाजासाठी आणि इतर समाजासाठीच्या खास योजना, शैक्षणिक सवलतींवर भर, शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठीची खास तरतूद, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी पाहाल बजेट?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. आज दुपारी २ वाजता हा अर्थसंकल्प सादर होईल. राज्याचा अर्थसंकल्प साध्या, सोप्या भाषेत तुम्ही टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीसह सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहु शकाल. टीव्ही 9 मराठी वेबसाईट tv9marathi.com आणि ॲपवर तुम्हाला बजेटच्या सर्व अपडेट मिळतील.

टीव्ही 9 मराठीचे व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक पेज, एक्ससह इतर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बजेटसंबंधीचे सर्व अपडेट मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या  youtube.com सुद्धा तुम्हाला लाईव्ह बजेट पाहता येईल. या बजेटसंबंधीच्या अपडेट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगमधून सुद्धा पटकन कळतील.

या ठिकाणी पाहा संपूर्ण अर्थसंकल्प

Front Page Before West Bengal

Live Tv

Non Stop LIVE Update
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई
भर सभागृहात शिवीगाळ करणं आलं अंगाशी, अंबादास दानवेंवर मोठी कारवाई.
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ज्यांनी जीवन संपवलं ते... संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?.
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?
हिजाबनंतर आता काँलेजमध्ये जीन्स, टी-शर्टवर बंदी, कॉलेजचा नवा नियम काय?.
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं
दक्षिण आफ्रिकेला लोळवणाऱ्या टीम इंडियाला वादळानं बार्बाडोसमध्ये रोखलं.
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?
मुंबईसह 'या' भागात 'कोसळधार', महाराष्ट्रासाठी IMD चा इशारा काय?.