PAN-Aadhaar linking : अजूनही नाही केली जोडणी? मग ही आहे शेवटची संधी, नाहीतर मोठे नुकसान
Pan Aadhaar Card Linking : आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या जोडणीची अनेकदा संधी देण्यात आली. पण हजार रुपयांचा दंड टाळण्यासाठी अनेकांनी जोडणी केली नाही. आता अशा नागरिकांना शेवटची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर हे काम लवकरात लवकर उरकावा. जे लोक 30 जून, 2023 रोजीपर्यंत त्यांचे पॅन-आधार जोडू शकले नाही. त्यांना आयकर खात्याने पुन्हा एकदा संधी दिली आहे. अशा नागरिकांना आता या 31 मेपर्यंत आधार कार्डसोबत पॅनकार्ड लिंक करता येणार आहे. आयकर विभागाने ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या करदात्यांवर टीडीएस कमी कपातीची कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर नियमांनुसार, करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. जर हे दोन्ही लिंक नसतील त सध्याच्या शुल्कापेक्षा त्यांना दुप्पट शुल्कासह टीडीएस भरावा लागणार आहे.
तक्रारीनंतर घेतला निर्णय
24 एप्रिल रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) याविषयीचे एक पत्रक काढले आहे. त्यानुसार, करदात्यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार व्यवहार करताना ज्या करदात्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, त्यांची टीडीएस कपात कमी असल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार नाही. अशा प्रकरणात टीडीएस उच्च दराने कपात न झाल्याने त्यांच्याविरोधात कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी सवलतीची मागणी केली होती.
त्यामुळे अशा प्रकरणात 31 मार्च, 2024 रोजीपर्यंत करण्यात आलेल्या व्यवहारात आणि 31 मे 2024 पूर्वी पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणी झाली असेल तर टीडीएस कपातीसंबंधी त्या करदात्यावर कोणतेही देणेदारी राहणार नाही.
हे नुकसान होईल
- पॅन-आधार लिंक न करण्याचे अनेक नुकसान
- सर्वात अगोदर तुम्हाला विलंब केल्याबद्दल दंड भरावा लागेल
- तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही रिफंड, परतावा मिळणार नाही
- पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही
- करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल करण्यात येईल
पॅन-आधार असे करा लिंक
- आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in वर जा
- Quick Links या सेक्शनमध्ये Link Aadhaar हा पर्याय निवडा
- तुमचे पॅन आणि आधार क्रमांक नोंदवा. Validate बटणवर क्लिक करा
- आधार कार्डनुसार तुमचे नाव, मोबाईल क्रमांक नोंदवा
- आता Link Aadhaar वर क्लिक करा
- तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपी टाका, Validate वर क्लिक करा