शेअर बाजार (Stock market) आज आणि उद्या बंद राहणार आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी साप्ताहिक सुटी (Weekly holidays) असल्यामुळे या आठवड्यात शेअर बाजार सलग चार दिवस बंद राहणार आहे. स्टॉक मार्केट हॉलिडे लिस्टनुसार 2022 मध्ये शनिवार आणि रविवार सोडून शेअर बाजार एकूण 13 दिवस बंद राहणार आहे. शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या चार दिवसांच्या सुटीला आजपासून सुरुवात झाली आहे. यावर्षीची शेवटची सुटी ही 8 नोव्हेंबर 2022 ला गुरुनानक जयंतीची (Guru Nanak Jayanti) असणार आहे. आज 14 एप्रिल आहे, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते त्यामुळे शेअर मार्केट बंद राहणार आहे. शुक्रवारी गुड फ्रायडे आहे. गुड फ्रायडे असल्यामुळे शेअरमार्केटला सुटी असेल तर शनिवार आणि रविवारी आठवडी सुटी असते. त्यामुळे या आठवड्यात शेअर मार्केट तब्बल चार दिवस बंद राहणार आहे.
आज चौदा एप्रिल आहे, चौदा एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, या निमित्त आज पहिल्या सत्रात कमोडिटी मार्केट देखील बंद राहणार आहे. दुसऱ्या सत्रात कारभाराला सुरुवात होईल. कमोडिटी मार्केटचे पहिले सत्र हे सकाळी नऊ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत असते. तर दुसरे सत्र हे सायंकाळी पाच वाजेपासून रात्री 11.55 पर्यंत असते. आज पहिल्या सत्रात तर उद्या दोनही सत्रांमध्ये कमोडिटी मार्केट बंद राहणार आहे.
मे महिन्यामध्ये रमजान ईदच्या दिवसी तीन मे रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. या महिन्यात केवळ एकच सुटी आहे. तर ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात शेअर मार्केट प्रत्येकी तीन दिवस बंद राहणार आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र दिन, 9 ऑगस्टला गणेश चतुर्थी आणि 31 ऑगस्टला मुहर्ममुळे शेअर बाजाराला सुटी असणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 5, 24 आणि 26 तारखेला शेअर बाजार बंद असणार आहे.
Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर