इराण-इस्त्राईलचा तणावाचा थेट परिणाम; दुसऱ्या दिवशी शेअर बाजार क्रॅश

Share Market Crash : जागतिक पटलावरील घडामोडींमुळे शेअर बाजार भयभीत झाला आहे. परदेशी गुंतवणूकदारांसह देशातील गुंतवणूकदारांनी पण बाजारात विक्रीचे सत्र आरंभले. बाजारात या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सलग घसरण दिसून आली. काय आहेत बाजाराचे संकेत..

इराण-इस्त्राईलचा तणावाचा थेट परिणाम; दुसऱ्या दिवशी शेअर बाजार क्रॅश
शेअर बाजाराची तात्काळ प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 11:05 AM

जगावर अजून एका नवीन युद्धाचे सावट आले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. हमास-इस्त्राईल युद्ध सुरु आहे. तर आता इराण आणि इस्त्राईल यांच्यात युद्ध भडकण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसला. सोमवारी बाजाराने कच खाल्ल्यानंतर आजही बाजारात घसरण दिसून आली. मंगळवारी बाजाराला सावरता आले नाही. 30 शेअर्सच्या मुंबई स्टॉक एक्सचेंज, सेन्सेक्स 500 अंकांहून जादा घसरला. सेन्सेक्स 73,000 अंकावर उघडला. तर निफ्टी पण आज पांगला.

सलग दुसऱ्या दिवशी बाजाराचे लोटांगण

शेअर बाजाराचे दोन इंडेक्स मंगळवारी लाल रंगात न्हाऊन निघाले. बीएसई सेन्सेक्स सकाळी 9.15 मिनिटांनी 507 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 72,892.14 अंकावर उघडला. तर सोमवारी सेन्सेक्स 73,399.78 अंकांवर बंद झाला होता. NSE Nifty पण लागलीच गर्भगळीत झाला. या खेळाडूची सुरुवातच अत्यंत खराब ठरली. सोमवारी निफ्टी 22,272.50 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी, आज तो 138 अंकांनी घसरुन 22,134 अंकांवर उघडला.

हे सुद्धा वाचा

Sensex मधील 30 पैकी 28 शेअर आपटले

बाजार उघडताच जवळपास 1078 शेअरने चढाई केली. तर 1131 शेअरमध्ये घसरण आली. 118 शेअरमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. BSE Sensex मध्ये सुद्धा 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअरला कोणताच करिष्मा दाखवत आला नाही. हे शेअर घसरले. त्यांच्यात मोठी पडझड झाली. शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी काळजी घेण्याचा सल्ला गुंतवणूकदार तज्ज्ञांनी दिला आहे. बाजारावर सध्या भावनेचा पगडा आहे. त्यामुळे डोळे झाकून गुंतवणूक न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाजारावर युद्धाचे सावट आहे. त्यानुसार बाजार प्रतिक्रिया देत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

या पाच शेअरमध्ये जास्त घसरण

LTIMindtree, NTPC, Bajaj Finance, TCS आणि Infosy या शेअरला बाजारात तग धरता आली नाही. त्यांच्यात सर्वाधिक घसरण दिसून आली. तर Titan Company, Bharti Airtel, SBI Life Insurance, Eicher Motors आणि Nestle च्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर IndusInd Bank, Bajaj Finserve, Bajaj Finance, Infosys आणि Wipro या स्टॉकमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.