Share Market : नवीन वर्षात शेअर बाजाराचा झटका, 1 दिवसात 2 लाख कोटींचा गुंतवणूकदारांना फटका, सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडले

Share Market : शेअर बाजाराच्या आपटी बारने गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले.

Share Market : नवीन वर्षात शेअर बाजाराचा झटका, 1 दिवसात 2 लाख कोटींचा गुंतवणूकदारांना फटका, सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडले
बाजार धडामधूम
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 8:04 PM

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने (share Market) अनेकदा गुंतवणूकदारांची परीक्षा पाहिली. बाजार कायम हिंदोळ्यावर होता. गेल्या अर्थसंकल्पानंतर (Union Budget) तर अनेकदा बाजाराने यू-टर्न घेतल्याने गुंतवणूकदार वेडेपिसे झाले होते. तरीही काही शेअर्संनी दमदार कामगिरी करुन गुंतवणूकदारांना (Investors) दिलासा दिला होता. यंदा वर्षांच्या सुरुवातीच्या आठवड्यातच बाजाराने गुंतवणूकदारांना जोरदार हात दिला. शेअर बाजाराच्या आपटी बारने गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले. शेवटच्या व्यापारी सत्रात बाजाराने त्याचा रंग दाखविल्याने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करताना चोखंदळ रहावे लागणार आहे.

शेअर बाजारावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वरचष्मा दिसला. शुक्रवारी, 6 जानेवारी, 2023 रोजी बाजार कायम हिंदोळ्यावर होता. बाजारात चढउतार दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार घसरण दिसून आली.

सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला तर निफ्टी जवळपास 17850 अंकांवर बंद झाला. बाजाराची सुरुवातच आज कमकुवत होती. नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतली. शेअर्सने ग्रीन सिग्नल दिला. थोड्यावेळाने विक्रीचे सत्र सुरु झाले आणि बाजार धराशायी झाला.

हे सुद्धा वाचा

आज सेन्सेक्समध्ये 453 अंकांची घसरण झाली आणि बाजार 59900 अंकावर बंद झाला. निफ्टीत 133 अंकांची घसरण झाली आणि बाजार 17859 अंकावर गडगडला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 2 लाख कोटी रुपये हातचे गेले.

आजच्या व्यापारी सत्रात प्रत्येक सेक्टरमध्ये जोरदार विक्री झाली. विक्री सत्रामुळे बाजारात भूकंप आला. निफ्टीत केवळ FMCG निर्देशंकानेच बाजाराचे नाक ठेवले. बँक, फायनान्शिअल, मेटल इंडेक्समध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली.

आज सर्वाधिक फटका बसला तो आयटी सेक्टरला. आयटी सेक्टरमध्ये जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसून आली. आयटी इंडेक्सचा कमकुवतपणा दिसून आला. फार्मा, ऑटो आणि रियल्टी इंडेक्सने गुंतवणूकदारांची निराशा केली.

मोठ्या शेअरमध्ये पण विक्रीचे सत्र दिसून आले. सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 शेअर्सने आज दम तोडला. TCS, INDUSINDBK, BAJFINANCE, KOTAKBANK, Infosys, Airtel, Tata Motors, Titan यांचे सर्वाधिक पानीपत झाले तर M&M, RIL, ITC, LT या शेअर्सने कमाईची संधी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.