Stock market update : शेअर मार्केट कोसळले! सेन्सेक्समध्ये हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

गुरुवारी शेअर बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल 1138.23 अंकाची घसरण पहायला मिळाली तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील 311 अंकाची घसरण झाली आहे.

Stock market update : शेअर मार्केट कोसळले! सेन्सेक्समध्ये हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 10:49 AM

मुंबई : जागतिक बाजारात मिळत असलेल्या नकारात्मक संकेतामुळे आज पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये (Stock Market) मोठी पडझड पहायला मिळत आहे. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) मोठ्याप्रमाणात घसरले. शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 1138.23 अकांनी घसरून 53,070.30 वर पोहोचला तर दुसरीकडे निफ्टी 311 अंकांनी घसरून 15,928.60 वर पोहोचली. आज बीएसई लिस्टेड 30 शेअर्सपैकी तब्बल 29 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत आहे. केवळ आयटीच्या शेअर्समध्ये 2.55 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. आज शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढला असून, लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅपवर देखील आज विक्री दिसून येत आहे. बीएसईच्या मिडकॅप इंडेक्समध्ये तब्बल 2.36 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर स्मॉलकॅपचा इंडेक्स 2.70 टक्के घसरणीसह कारभार करत आहे. दरम्यान आज शेअरबाजारात सर्वत्र विक्री पहायला मिळत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

गुंतवणूकदारांना मोठा धक्का

आज शेअरबाजार सुरू होताच पहिल्या सत्रात मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 1138.23 अकांनी घसरणून 53,070.30 वर पोहोचला तर दुसरीकडे निफ्टी 311 अंकांनी घसरून 15,928.60 वर पोहोचली. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. 18 मे रोजी बीएसई शेअर मार्केटची एकूण मार्केट कॅप 2,55,77,445.81 कोटी रुपये होती. आज शेअर मार्केट सुरू होताच विक्रीचा दबाव वाढल्याने मार्केट कॅपमध्ये तब्बल 4,80,890.69 कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या बीएसई शेअरबाजाराची मार्केट कॅप 2,50,96,555.12 कोटी रुपये इतकी आहे.

आशीयाई शेअर मार्केटमध्ये मंदी

केवळ भारतीय शेअर बाजारातच नाही तर संपूर्ण आशीयाई शेअर बाजारात मंदीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी एसजीएक्स निफ्टीमध्ये 316.50 अंकांची घसरण पहायाला मिळाली. एसजीएक्समध्ये 2.63 टक्क्यांची घसरण झाली. दुसरीकडे स्ट्रेट टाइम्समध्ये 0.92 तर हॅंगसेनमध्ये 2.89 टक्क्यांची घसरण झाली आहे. तैवानच्या शेअर बाजारात देखील मोठी उलथापालथ पहायला मिळत असून, मार्केटमध्ये सुरू असलेल्या मंदीमुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.