Stock Market Crashed : शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 700 अंकाची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका

आज पुन्हा एकदा शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण झाली असून, निफ्टीमध्ये देखील मोठी घट पहायला मिळत आहे.

Stock Market Crashed : शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 700 अंकाची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 2:23 PM

Stock Market Update:वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने वाढवलेले व्याज दर (US Interest Rate Hike) आणि मिळणाऱ्या मंदीच्या संकेतांमुळे आज गुरुवारी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड पहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल सातशे अकंनी घसरला असून, निफ्टीमध्ये देखील मोठी पडझड पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीचे सत्र सुरूच आहे. परंतु आज सकाळी जेव्हा शेअर बाजार ओपन झाला तेव्हा शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. सेन्सेक्स 550 अंकानी वधारला होता. त्यामुळे आज तरी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहील असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.

पहिल्या सत्रात तेजी

आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी एक टक्क्यांची वाढ झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्स 550 अंकांच्या वाढीसह 53 हजारांवर पोहोचला होता. तर निफ्टी देखील 150 अंकांनी वाढून 15,850 अंकांवर पोहोचला होता. शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पडझड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज दुपारच्या सत्रात शेअर मार्केट अचानक कोसळले. सेन्सेक्स 700 अकांच्या घसरणीसह 51,900 अकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये देखील 225 अंकांची घसरण झाली असून, निफ्टी 225 अंकांच्या घसरणीसह 15,465 अंकांवर पोहोचला आहे. जूलै 2021 नंतर आज शेअर बाजार सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकेने व्याज दर वाढवला

अमेरिकेमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. चालू आठवड्यात अमेरिका महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याज दरात वाढ करू शकते असा अंदाज होता. तो अंदाज खरा ठरला आहे. आज अमेरिकेकडून व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेने व्याज दर वाढीची घोषणा करताच त्याचा नकारात्मक परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.