Share Market गडगडले, अनेक अब्जाधीशांच्या इमल्यांना हादरे, झाले मोठे नुकसान

Share Market | बुधवारी सकाळी शेअर बाजाराने उसळी घेतली आणि नंतर बाजार कोसळला. त्यामुळे जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली. सर्वाधिक नुकसान एलॉन मस्क आणि गौतम अदानी या दिग्गजांना झाले. जगातील 288 श्रीमंतांची संपत्ती कमी झाली. तर 179 अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली.

Share Market गडगडले, अनेक अब्जाधीशांच्या इमल्यांना हादरे, झाले मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 2:41 PM

नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : बुधवारी भारतच नाही तर अमेरिका आणि युरोपातील बाजाराने गुंतवणूकदारांना इंगा दाखवला. या कोसळधारेमुळे जगातील अब्जाधीशांची संपत्ती स्वाहा झाली. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. जगातील 288 अब्जाधीश या वादळात गरीब झाले. शेअर बाजार कोसळल्याचा सर्वाधिक फटका एलॉन मस्क आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांना बसला. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, दोघांचे मिळून एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. या यादीत वॉरेन बफे, जेफ बेजोस, मुकेश अंबानी, सावित्री जिंदल हे पण सहभागी आहेत. जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 8300 कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली.

या अब्जाधीशांनी गमावली सर्वाधिक संपत्ती

जगातील 10 अब्जाधीशांनी 100 कोटी डॉलरपेक्षा पण अधिकची संपत्ती गमावली. यामध्ये अमेरिकेतील 5 अब्जाधीशांचा समावेश आहे. या यादीत एलॉन मस्क यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यांच्या संपत्तीत 7000 कोटींहून अधिक डॉलरची घसरण झाली. तर या यादीत भारताच्या 3 अब्जाधीशांची नावे आहेत. त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक घसरण झाली. गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक घसरण दिसून आली. बुधवारी शेअर बाजारात आलेल्या घसरणीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 4.84 अब्ज डॉलरने कमी झाली. तर मुकेश अंबानी आणि सावित्री जिंदल यांना पण आर्थिक झळ सोसावी लागली. चीनमधील कोलिन हुआंग आणि मॅक्सिकोचा कार्लोस स्लिम यांचे पण नाव या यादीत आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील 288 अब्जाधीशांना फटका

जगातील विविध देशातील अब्जाधीशांना या त्सुनामीचा फटका बसला. शेअर बाजारातील घसरणीमुळे जगभरातील 288 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण दिसली. ब्लूमबर्ग बिलिनिअर्सच्या यादीनुसार 33 अब्जाधीशावर काहीच फरक दिसून आला नाही. तर 179 अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ दिसून आली. तीन अब्जाधीशांच्या संपत्तीत 100 कोटी डॉलरहून अधिकची उसळी दिसून आली. यामध्ये जपानचे तादाशी यनाई यांचा समावेश आहे. त्यांच्या संपत्तीत 1.49 अब्ज डॉलरची भर पडली. तर अमेरिकेचे लॅरी पेज यांच्या संपत्तीत 1.39 अब्ज डॉलरची भर पडली. सर्जी ब्रिन यांच्या नेटवर्थमध्ये 1.32 अब्ज डॉलरची वाढ झाली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.