कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे भांडवली बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. भांडवली बाजारावरही त्यांचा परिणाम दिसून आला. (stock market investor loss)

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे भांडवली बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 7:35 PM

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. भांडवली बाजारावरही त्यांचा परिणाम दिसून आला. कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे आठवड्याच्या पहिल्याच (सोमवारी) दोन्ही निर्देशांक चांगलेच घरंगळल्याचे दिसले. चालू सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी बुडाले आहेत. (stock market has been collapsed due to corona virus investor seven crore loss)

दिवसाअखेर सेंसेक्स (sensex) 1406 अंकांनी घरंगळून 45,553.96 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी (nifty) 432 अंकानी कमी होऊन 13,328.40 अंकापर्यंत स्थिरावला.

निर्देशांक कमी होण्याचे कारण काय?

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच, अनेक देशांनी विमान उड्डणांवर बंदी घातली आहे. या गोष्टीचा भांडवली बाजारावर दबाव पाहायला मिळाला. दिवसभरात बँक, ऑटो, फायनान्स सेवा या प्रमुख सेक्टर्ससोबतच इतर अनेक सेक्ट्रर्सवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

युरोपीय शेअर बाजारावरही कोरोनाचा नकारात्मक परिणाम दिसून आला. निर्देशांकाचा दिवसभरातील कल, आणि कोरोनाविषयक घडामोडी पाहून भारतीय शेअर बाजारात शेअर्सच्या विक्रीचा मोठा दबाव निर्माण झाला. तर याच दबावामुळे सेंसक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपये बुडाले

आठवड्याचा आजचा पहिलाच दिवस होता. आजचे सत्र गुंतवणूकदारांठी वाईट राहिलेय. कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीमुळे भांडवली बाजारामध्ये खळबळ उडाली. त्यामुळे दिवसभरात गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटी रुपये बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारावरील एकूण कंपन्यांचे बांडवल 1,85,38,636.70 कोटी रुपये होते. ते सोमवारच्या भांडवली सत्रात 7,05,403.79 कोटींनी कमी होऊन 1,78,33,232.91 रुपयांवर येऊन ठेपले. त्यामुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडस्ट्रीजना फटका

कोरोनामुळे मोठ्या इंडस्ट्रीजना फटका तर बसलाच, मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्सचीही किंमत कमी झाली. भारतीय शेअर बाजारावरील स्मॉलकॅप इंडेक्स 4.17 टक्क्यांनी तर मिडकॅप इंडेक्स 4.14 टक्क्यांनी कमी झाला.

संबंधित बातम्या :

Gold Price : सोने खरेदी करण्याची हीच ती वेळ?; सोनं 56000 पर्यंत जाण्याची शक्यता

‘या’ 3 सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण; बँकेत जमा पैसे किती सुरक्षित?

PF Account मध्ये अशी अपडेट करा बँकेची माहिती; फक्त तीन टप्पे आणि काम फत्ते

(stock market has been collapsed due to corona virus investor seven crore loss)

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.