शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 59 अंकांनी गडगडला; रशिया-युक्रेन वादाचे पडसाद

आज (शुक्रवारी) सेन्सेक्समध्ये 60 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 17300 अंकाच्या खाली बंद झाला. आज दिवसभरात रिअल्टी, ऑटो आणि फार्मा शेअरवर (Stock Market) विक्रीचा दबाव राहिला. निफ्टी रिअल्टी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. रशिया-युक्रेन (RUSSIA-UKRANE ISSUE) वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम राहिले. 

शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 59 अंकांनी गडगडला; रशिया-युक्रेन वादाचे पडसाद
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:14 PM

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन (RUSSIA-UKRANE ISSUE) वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम राहिले. दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) तेजीचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, अर्थ जगातील वेगवान घडामोडींचा थेट परिणाम होऊन दिवसाखेर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण नोंदविली गेली. आज (शुक्रवारी) सेन्सेक्समध्ये 59 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 17300 अंकाच्या खाली बंद झाला. आज दिवसभरात रिअल्टी, ऑटो आणि फार्मा शेअरवर विक्रीचा दबाव राहिला. निफ्टी रिअल्टी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ऑटोमोबाईल व फार्मा निर्देशांकात (PHARMA INDEX) 0.6 आणि 0.8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. 30 पैकी 17 शेअर्सची कामगिरी निराशाजनक राहिली. सेन्सेक्सचा आलेख 59 अंकांच्या घसरणीसह 57,832.97 वर तर निफ्टी 28 अंकांच्या घसरणीसह 17276 वर पोहोचला. आजच्या घसरणीच्या शेअर्समध्ये अल्ट्राकेमको, एम अँड एम, इन्फी, बजाज फायनान्स, रिलायन्स आणि नेस्लेइंडिया यांचा समावेश होतो.

आजचे वधारणीचे शेअर्स:

• कोल इंडिया (2.64) • एसबीआय लाईफ इन्श्युरन्स (2.14) • एचडीएफसी (1.22) • बजाज ऑटो (0.97) • लार्सेन (0.77)

आजचे घसरणीचे शेअर्स:

• ओएनजीसी (-2.24) • सिप्ला (-2.06) • डिव्हिज् लॅब्स (-2.00) • अल्ट्राटेक (-1.84) • श्री सिमेंट (-1.51)

विक्रमी घसरण

रशिया-युक्रेनचा वाढता वाद, इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमती, शेअर्स विक्रीचे वाढते सत्र यांचा सर्वाधिक परिणाम चालू आठवड्यात शेअर बाजाराच्या कामगिरीवर दिसून आला. चालू आठवड्यात शेअर बाजारात विक्रमी घसरण नोंदविली गेली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल 1750 अंकांनी निर्देशांक गडगडला आणि निफ्टी 17 हजारांच्या खाली घसरला होता.

वाद मिटेना, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले

युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थ जगतावर उमटले. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर वातावरणातील तणाव निवळला होता. पश्चिमी देशांसोबत चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी म्हलटे होते. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण नोंदविली गेली. सध्या कच्च्या तेलाचे दर 2.55 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र तरी देखील गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चतेचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

Good news ! आयटी क्षेत्रात मार्चपर्यंत ३.६ लाख नवीन लोकांना रोजगार

ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा

जीएसटीत फेरबदलाचे वारे : टॅक्स स्लॅब घटणार, वस्तू महागणार; राज्यांना शून्य भरपाई!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.