Stock Market : शेअर बाजारात प्रत्येक 3 वर्षांत पैसा होऊ शकतो डबल; वापरा ही स्ट्रॅटेजी

Share Market : भारतात शेअर बाजारात जोखीम असल्याने अनेकजण पैसा गुंतवणूक करताना हात आखडता घेतात. पण योग्य रणनीती असेल, मार्गदर्शन असेल तर शेअर बाजारातून 3 वर्षांतच पैसा दुप्पट करता येऊ शकतो.

Stock Market : शेअर बाजारात प्रत्येक 3 वर्षांत पैसा होऊ शकतो डबल; वापरा ही स्ट्रॅटेजी
याशिवाय देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये पाच दिवसात 1,075.25 कोटी रुपये वाढले. कंपनीचे भांडवल आता 7,47,677.98 कोटी रुपयांवर पोहचले.
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 3:12 PM

शेअर बाजारात ‘रिस्क है तो इश्क है’ , हे वाक्य चपखल बसते. जो जोखीम घेऊ शकतो, त्याला फळ मिळते असे म्हणतात. भारतात, शेअर बाजारात अनेकजण अजूनही रक्कम गुंतवण्यास घाबरतात. कारण यामध्ये मोठी जोखीम आहे. पण योग्य रणनीती, तज्ज्ञाचा योग्य सल्ला आणि अभ्यास या बळावर तुम्ही शेअर बाजारातून 3 वर्षांतच मालामाल होऊ शकतात.

कसा होईल पैसा डबल?

जर तुम्ही शेअर बाजारात केवळ 3 वर्षांत पैसा दुप्पट करु इच्छित असाल तर काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. अर्थात शेअर बाजारात निश्चिती अशी कोणतीच स्ट्रॅटेजी नसते. किंवा निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नसतो, जो तुम्हाला नोटा छापण्यासाठी मदत करेल. काळ, परिस्थिती, बाजाराची दिशा-दशा आणि तुमचा अनुभव यावर बरंच गणित अवलंबून असते.

हे सुद्धा वाचा

मर्यादित राहू नका – शेअर बाजारात अनेकदा गुंतवणूक करताना अनेक जण एक साचेबद्ध पद्धतीने गुंतवणूक करतात. खुलेपणाने विविध स्ट्रॅटेजीचा वापर करुन गुंतवणूक करा. लार्ज कॅप, मल्टी कॅप, स्मॉल कॅपच नाही तर इतरी पर्याय शोधा.

पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवा – स्टॉक मार्केट तज्ज्ञ रमेश दमानी यांनी ईकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओ नेहमी डायव्हर्सिफाय ठेवावा. विविध क्षेत्रातील चांगल्या कंपन्या निवडून अथवा तसा ग्रुप, कंपनीत गुंतवणूक करणे हिताचे ठरते.

भविष्यातील घाडमोड टीपा – रमेश दमानी यांच्या मते भविष्यातील घडामोड ज्याला अगोदर कळते, अथवा ज्याला त्याचा अंदाज बांधता येतो तो खरा गुंतवणूकदार आहे. हा गुण गुंतवणूकदाराच्या अंगी असणे आवश्यक आहे. कोणत्या क्षेत्रातील, कोणती कंपनी अग्रेसर राहिल, कोणती कंपनी आगेकूच करेल. कोणते क्षेत्र आघाडी घेईल, याची माहिती त्याला असणे आवश्यक आहे. येत्या काळात अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, पायाभूत सुविधा क्षेत्र भरारी घेऊ शकते. तुमच्या तज्ज्ञाशी बोलून तुम्ही गुंतवणूक करु शकता.

फंडामेंटल जरुर तपासा – शेअर बाजारात कोणता स्टॉक लांबपल्ल्याचा खेळाडू असेल हे तपासणे आवश्यक असते. कोणत्याही इन्स्टाग्राम, युट्यूब अथवा इतर सोशल मीडियावरील रील्स पाहुन तुमचा गुंतवणुकीचा निर्णय अजिबात घेऊ नका. कंपनीचे फंडामेंटल जरुर तपासा. कंपनीची संपूर्ण माहिती असू द्या. तिची गुंतवणूक, नवीन योजना याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.