नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) सोमवारी काय चालणार चाल? स्टॉक मार्केटमध्ये असेल तेजी की येईल मंदीची लाट? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या (Investors) मनात आहे. तेव्हा बाजारात भावनेचा बाजार चालणार की, परदेशी गुंतवणूकदार पुन्हा प्रभाव टाकणार हे पाहुयात..
बाजार पुढील आठवड्यात तेज राहिल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामागचे प्रमुख कारण हे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आहेत. परदेशी गुंतवणूकदारांचा बाजाराकडे पुन्हा ओढा वाढला आहे. परिणामी बाजार नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येतील. तर काहींचे निकाल जाहीर होतील. जागतिक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदार यांची भूमिका बाजाराची दिशा ठरवतील.
सोमवारी बाजार सुरु होईल. तर मंगळवारी गुरु नानक जयंतीमुळे बाजाराला सुट्टी राहिल. त्यामुळे या आठवड्यात पाच दिवस नाही तर केवळ चार दिवस उलाढाल होईल.औद्योगिक उत्पादन सूचकांकची आकडेवारीही याच आठवड्यात घोषीत होणार आहे.
बाजारात पुढील आठवड्यात बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, हिंडाल्को आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येतील. या कंपन्याच्या निकालाचाही परिणाम बाजारावर होईल.
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत निव्वळ 74 टक्क्यांचा लाभ मिळविला आहे.एसबीआयने 13,265 कोटींचा फायदा मिळवला. याचाही परिणाम बाजारात दिसून येईल.
जवळपास दोन महिन्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळे बाजारात तेजी राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.