Stock market update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. शेअर मार्केट सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 1200 अकांनी कोसळा आहे.

Stock market update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:19 AM

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. शेअर मार्केट (stock market) सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पहायला मिळत आहे. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) 1118 अंकांच्या घसरणीसह 53184 च्या पातळीवर ओपन झाला. तर निफ्टी (Nifty) 324 अंकांच्या घसरणीसह 15877 वर ओपन झाला. व्यवहार सुरू झाल्यानंतर अवघ्या पच मिनिटांच्या आतच सेन्सेक्स पुन्हा कोसळला. सध्या सेन्सेक्स तब्बल 1250 पेक्षा अधिक अकांनी घसरला आहे. सेन्सेक्समधील घसरण थांबायचं नाव घेत नसल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, इंडसइंड बँक अशा जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. याला अपवाद म्हणजे सन फार्मा आणि पॉवर ग्रिडचे शेअर मात्र हिरव्या निशाणावर कारभार करत आहेत.

जागतिक बाजारावर विक्रीचा दबाव

शेअर मार्केटवर सध्या जागतिक विक्रीचा दबाव दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. शेअर बाजार तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा महागाईचा हा दर कितीतरी पटीने अधिक आहे. वाढत असलेल्या महागाईमुळे अमेरिकन रिझर्व्ह फेडरवर व्याज दर वाढीचा दबाव निर्माण झाला आहे. या सर्व बातम्यांमुळे अमेरिकेचा शेअर बाजार देखील कोसळला आहे. डाऊ जोन्स, एस अँण्ड पी तसेच नेसडॅकमध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. डाऊ जोन्स 2.73 टक्के, एस अँण्ड पी 2.91 टक्के तर नेसडॅकमध्ये 3.52 टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होत असून, भारतीय शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढला असून, बीएसई लिस्टेड कंपन्यांचे शेअर कोसळत आहेत.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारीही पडझड

दरम्यान गेल्या आठवड्यात शुक्रवारी देखील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड पहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 1016.84 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 54,303.44 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये देखील मोठी घसरण पहायला मिळाली. निफ्टी 16,201.80 अंकांवर बंद झाला. दरम्यान शेअर मार्केटमधील पडझड सुरूच असून, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट कोसळल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.