Stock Market Update: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये 800 तर निफ्टीमध्ये 200 पेक्षा अधिक अंकांची घसरण

शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच आहे. गेल्या आठवड्यात शेअरबाजार 866.65 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 800 अकांनी कोसळला आहे.

Stock Market Update: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये 800 तर निफ्टीमध्ये 200 पेक्षा अधिक अंकांची घसरण
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 10:59 AM

Stock Market Update : कोरोनाचे (Corona) संकट टळले आहे, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. तसेच सातत्याने व्याज दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या दोन प्रमुख कारणांमुळे जगभरातील शेअर मार्केटवर (Stock market) विक्रीचा दबाव वाढला आहे. भारतीय शेअर बाजारावर देखील याचा परिणाम दिसत असून, गेल्या आठवड्यात देखील शेअर बाजारात मंदीचे वातावरण होते. आज सोमवारी शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेसेंक्स (Sensex) आणि निफ्टी दोन्हीमध्ये देखील एक टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. शेअर बाजार सुरू होण्याआधीच आज शेअर बाजारातून मंदीचे संकेत मिळत होते. पहिल्या सत्राला सुरुवात होताच शेअर बाजार 700 अंकांनी कोसळला तर साडेनऊच्या सुमारास त्यात आणखी दोनशे अंकांची भर पडली असून, आज शेअर बाजार 800 अकांनी कोसळला. सध्या सेन्सेक्स 54 हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील घसरण पहायला मिळत आहे. निफ्टी 220 अकांनी कोसळून 16,180 अकांवर पोहोचला आहे.

गुंतवणूकदारांना मोठा फटका

दरम्यान यापूर्वी देखील मागील शुक्रवारी सेन्सक्समध्ये घसरण पहायला मिळाली होती. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये तब्बल 866.65 अकांची घट झाली होती. दीड टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स 54,835.58 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये 271.40 अकांची म्हणजे 1.63 टक्के घसरणीची नोंद झाली. निफ्टी 271.40 अंकाच्या घसरणीसह 16,411.25 अंकांवर बंद झाला. आज पुन्हा एकदा शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 800 अंकांची तर निफ्टीमध्ये 220 अकांनी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात घसरण सुरूच असल्याने गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका बसला आहे.

शेअर बाजारावर विक्रीचा दबाव

सध्या जागतिक बाजारावरच विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी अमेरिकी बाजारात देखील मोठा फेरबदल पहायला मिळाला, नास्डॅकमध्ये 1.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेसोबतच आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी मंदीचे वातावरण होते. आशिया बाजारात आज देखील घसरण सुरूच आहे. जपानी शेअर बाजाराचा टॉपिक्स इंडेक्स देखील 1.4 टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत असून, गुंतवणूकदार शेअर मार्केटमधील गुंतवणूक कमी करताना दिसत आहेत.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.