Stock market update : शेअर बाजार आज पुन्हा कोसळला, सेन्सेक्समध्ये 450 अंकाची घसरण, गुंतवणूकदारांना मोठा फटका
जागतिक शेअरबाजारात (Stock Market) सध्या घसरण पहायला मिळत आहे. त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर देखील झाला असून, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये (Sensex) 450 अंकांची घसरण झाली.
मुंबई : जागतिक शेअरबाजारात (Stock Market) सध्या घसरण पहायला मिळत आहे. त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर देखील झाला असून, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये (Sensex) 450 अंकांची घसरण झाली. तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) देखील 120 अकांनी घसरला. आज शेअर बाजार सुरू होताच 30 पैकी 27 शेअर्समध्ये घसरण झाली. केवळ तीन कंपन्याचे शेअर्स तेजीत आहेत. बुधवारी बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स कोसळला तर दुसरीकडे एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली. मंगळवारी शेअर बाजारात मोठी उलाढाला पहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स 776.72 अकांच्या वाढीसह शेअर बाजार बंद झाला होता. आज देखील शेअर बाजारात तेजी राहण्याचा अंदाज गुंतवणूकदारांना होता, मात्र शेअर बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचे पहायला मिळाले.
गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांचा फटका
बुधवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेंक्स 450 अंकांनी तर निफ्टी 120 अकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदारांचे तब्बल 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली, सेन्सेक्स 776.72 अंकाच्या वाढीसह शेअर बाजार बंद झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मंगळवारी मार्केट कॅप 4,11,627.5 कोटी रुपयांनी वाढून 2,69,41,299.15 कोटी रुपयांवर पोहोचली होती. मात्र आज पुन्हा एकदा शेअर बाजार कोसळल्याने मार्केट कॅपमध्ये 1,20,901.99 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
अमेरिकन बाजारात मंदीचे वातावरण
मंगळवारी एकीकडे भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत होती, मात्र दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजारात मंदीचे वातावरण पहायला मिळाले. अमेरिकन शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्याने नेस्डेकमध्ये 3.95 टक्क्यांची घसरण झाली. शेअर बाजार घसरल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार, युक्रेन, रशिया युद्धा, वाढती महागाई अशा अनेक घटकांचा सध्या शेअर बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.