Stocks: बाजारात हे तीन प्लेयर करणार धमाल, तुम्ही होणार मालामाल

Stocks: शेअर बाजारावर मंदीचे सावट आहे, अशा ही परिस्थितीत हे शेअर गेम चेंजर्स ठरू शकतात..

Stocks: बाजारात हे तीन प्लेयर करणार धमाल, तुम्ही होणार मालामाल
बाजारात हे शेअर्स करतील धमालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 5:31 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारावर (Share Market) जागतिक मंदीचे (Recession) सावट आहे. शेअर बाजारात सातत्याने उतार-चढाव सुरुच आहे. ऑगस्ट महिना सोडला तर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) तुफान शेअर्सची विक्री केली आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. अशा संकटाच्यावेळी ही काही छुपे बॅट्समन तुम्हाला कमाईच्या धावा काढून देऊ शकतात.

बाजारातील परिस्थिती टाईट असली तरी काही कंपन्या गुंतवणूकदारांना तगडा रिर्टन मिळवून देत आहे. या चमत्कारामुळे बाजारातील तज्ज्ञही आवाक झाले आहेत. या शेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे बाजार विरुद्ध दिशेने असताना गुंतवणूकदारांना फायदा होत आहे.

तर बाजारात प्रवाहाच्या विरुद्ध कामगिरी बजावणारे हे स्टॉक कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? तर त्याचे उत्तर आहे या तीन नावाजलेल्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक येत्या 15 दिवसांत तुमचे नशीब उघडू शकते.

हे सुद्धा वाचा

यामध्ये कल्पतरू पॉवर, लिबर्टी शूज, एलटी फूडस या कंपन्यांचा बाजारातील तज्ज्ञांनी समावेश केला आहे. FII सध्या जोरात विक्री करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीतही तुम्हाला 2 ते 3 आठवड्यात जबरदस्त नफा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Kalpataru Power Transmission हा स्टॉक 448 रुपयांना आहे. हा शेअर 554 रुपयांचं लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे. तर 397 रुपयांचा स्टॉप लॉस असेल. तज्ज्ञांच्या मते 2 ते 3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 24 टक्के परतावा मिळू शकतो. म्हणजेच हा शेअर तुम्हाला दिवाळीची भेट देऊ शकतो.

LT Foods (एलटी फूड्स) या शेअरची किंमत सध्या 122.40 रुपये आहे. हा शेअर 150 रुपयांवर जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर 105 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते 2 ते 3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 22 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळू शकतो.

Liberty Shoes (लिबर्टी शूज) हा स्टॉक सध्या 366.10 रुपयांना मिळत आहे. हा शेअर बंपर लॉटरी ठरु शकतो. 434 रुपयांचे लक्ष्य हा स्टॉक गाठू शकतो. तज्ज्ञांच्या मते, 2 ते 3 आठवड्यात या स्टॉकमध्ये 19 टक्क्यांचा जबरदस्त परतावा मिळू शकतो.

विशेष सूचना: हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.