नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : भारतात, टाटा, बाटा या कंपन्या त्यांच्या नावाने ओळखल्या जातात. हा ब्रँड त्यांच्या उत्पादनासाठी ओळखल्या जातो. आता या स्पर्धेत अनेक कंपन्या उतरल्या आहेत. पण त्यांना टाटा,बाटा, गोदरेज (Tata, Bata, Godrej) वा इतर ब्रँडसारखी उत्पादन निगडीत ओळख तयार करता आलेली नाही. या कंपन्या बाजारातील दादा कंपन्या असतील. पण त्यांना अशी स्वतंत्र ओळख अथवा ग्राहकांच्या मनात घर करता आलेले नाही. पण डाबर या कंपनीचे नाव तुम्ही हमखास ऐकले असेलच. ही कंपनी तशी 100 वर्षांपूर्वीच आहे. या कंपनीने पण ग्राहकांची स्वतंत्र ओळख पटवून देण्यात कुठलीच कसर सोडली नाही. त्याचाच फायदा त्यांना हाजमोला (Dabur Hajmola) या पाचक गोळीच्या रुपाने मिळाला आहे. भारतीय या चटकदार हाजमोलाच्या प्रेमात पडले आहे. त्यातून डाबरला कोट्यवधींची कमाई होते.
Power Brand मध्ये समावेश
तर डाबर कंपनी देशातील दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. हाजमोला हा ब्रँड भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे. या ब्रँडने अनेक रेकॉर्ड इतिहास जमा केले आहे. त्याची आगळीवेगळी चव ग्राहकांना आकर्षित करते. त्यामुळेच कंपनीने हा हाजमोलाला त्यांच्या Power Brand मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोज 2.4 कोटी हाजमोला गोळ्यांची विक्री
टाईम्स ऑफ इंडियातील एका रिपोर्टनुसार, डाबरचा सर्वात फेव्हरेट ब्रँड म्हणून हाजमोला विक्री होतो. देशात दररोज 2.4 कोटी हाजमोला गोळ्यांची विक्री होते. म्हणजे भारतीय प्रत्येक दिवशी दोन कोटींहून अधिक हाजमोला गोळ्या मटकावतात. बाजारातील एकट्या हाजमोलाचाच वाटा या क्षेत्रात 50 टक्क्यांहून अधिक आहे. या ब्रँडच आता एक दंत कथा झाला आहे. त्याने अनेक कंपन्यांना धक्का दिला आहे. पोटाच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी अनेक भारतीय हाजमोला खातात.
400 कोटींहून अधिकची कमाई
डाबर इंडियाचे सीईओ मोहित मल्होत्रा यांच्यानुसार, डाबर आता हाजमोलाला पॉवर ब्रँड तयार करण्याच्या तयारीत आहे. सध्या हा ब्रँड 350 ते 400 कोटी रुपयांचा आहे. कंपनी या ब्रँडच्या विस्ताराची योजना आखत आहे. ब्रँड अजून घरापर्यंत पोहचविण्यासाठी कंपनीने खास प्लॅन आखला आहे. सध्या डाबरचे FMCG सेक्टरमध्ये वेगवेगळे उत्पादने बाजारात आहेत. यातील 8 भारतात तर एक उत्पादन परदेशी बाजारात उपलब्ध आहे. बाजारात डाबरची 70 टक्के वाटा आहे.
एकूण 17 ब्रँड
बाजारात डाबरची 70 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीकडे सध्याच्या घडीला एकूण 17 ब्रँड आहेत. ते सर्व 100-500 कोटींदरम्यान आहेत. कंपनी आता या सर्व ब्रँडच्या विस्ताराची योजना तयार करत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यापेक्षा बाजारात त्यांना मोठा वाटा मिळेल.