Gautam Adani : आता रॉकेट होतील अदानी समूहाचे शेअर, गौतम अदानी यांनी मारला षटकार

Gautam Adani : अदानी समूहाचे शेअर लवकरच जोरदार मुसंडी घेण्याची दाट शक्यता आहे. गौतम अदानी यांनी जोरदार षटकार हाणला आहे. नेमकी काय घडली घडामोड, तुम्हाला माहिती आहे की नाही..

Gautam Adani : आता रॉकेट होतील अदानी समूहाचे शेअर, गौतम अदानी यांनी मारला षटकार
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली : अदानी समूहाचे (Adani Group) शेअर येत्या काही दिवसांत जबरदस्त उसळी घेण्याची शक्यता आहे. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी बाजीच पलटवून टाकली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूह पिछाडीवर गेला होता. हिंडनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) एका अहवालाने मोठं वादळ आलं. त्यात अदानी समूहाचं मोठं नुकसान झालं. यावर्षी 24 जानेवारी रोजी हा बॉम्ब पडला होता. अदानी समूहाचे शेअर गडगडले होते. अदानी समूहाने सर्व आरोपाचं खंडन केलं होतं. पण गुंतवणूकदारांचा, बाजाराचा विश्वास कमवायला अदानी समूहाला दोन ते तीन महिने लागले. दरम्यान आता अदानी समूहाने मनं जिंकण्यासाठी आणखी एक जोरदार पाऊलं टाकलं आहे.

गौतम अदानी यांचा षटकार गौतम अदानी यांच्या या समूहाने 2.65 अब्ज डॉलरचे कर्ज वेळेच्या आतच फेडले आहे. समूहाने अंबुजा सिमेंटसाठी(Ambuja Cements) हे कर्ज घेतले होते. ही सिमेंट कंपनी ताब्यात घेण्यासाठी समूहाने कर्ज घेतले होते. कंपनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11,796 कोटी रुपये, 2025 मध्ये 32,373 कोटी रुपये आणि 2026 मध्ये 16,614 कोटी रुपयांचं कर्ज फेड करणार आहे. ही मोठं कर्ज परतफेड केल्यानं बाजाराने लागलीच त्याला सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

बाजारात घसरण, अंबानीचे शेअर तेजीत बाजारात घसरणीचे सत्र असताना अंबानी समूहाचे अनेक शेअर तेजीत होते. या समूहाच्या 10 शेअर्स पैकी 8 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. कर्ज परतफेडीमुळे कंपनीकडे चलन तरलता, पैसा भरपूर असल्याचे शुभ संकेत बाजारात गेले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसा ओतला.

हे सुद्धा वाचा

इतक्या कर्जाची परतफेड या समूहाने 12 मार्चपर्यंत 2.15 अब्ज डॉलरचे कर्ज फेडले आहे. वेळेच्या आतच कर्जाची फेड करण्यात आली. प्रमोटर्सने अंबुजा सिमेंट कंपनी खरेदीसाठी 70 कोटींचे घेतलेले कर्ज प्रमोटर्सने चुकते केले. त्यासाठी 20.3 कोटींचे व्याज मोजण्यात आले. अदानी ग्रुपच्या पोर्टफोलिओतील कर्जाचा बोझा कमी झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ते 3.81पट होते. या आर्थिक वर्षात 3.27 पट उरले आहे.

कर्ज आणि शिल्लक आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रमोटर्स ग्रुपच्या चार सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर GQG Partners ला 15,500 कोटी रुपयांत विक्री केले होते. या समूहाने केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 4.75 अब्ज डॉलर (40,351 कोटी रुपये) शिल्लक रोख आहे. एकूण कॅश बॅलेन्स 77,889 कोटी रुपये आहेत. येत्या तीन वर्षांत कंपनीने कर्ज फेडण्याची तयारी केली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11,796 कोटी रुपये, 2025 मध्ये 32,373 कोटी रुपये आणि 2026 मध्ये 16,614 कोटी रुपयांचं कर्ज फेड करणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.