कोरोना काळातही सोन्याची जोरदार खरेदी, गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीमध्ये 22.58% वाढ

| Updated on: Apr 18, 2021 | 5:24 PM

सोन्याच्या आयातीमध्ये वाढ असूनही गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या व्यापारात घट होऊन 98.56 अब्ज डॉलरवर गेला. 2019-20 मध्ये हा व्यापार 161.3 अब्ज डॉलर्स होता. (Strong buying of gold even during the Corona period, 22.58% increase in gold imports in the last financial year)

कोरोना काळातही सोन्याची जोरदार खरेदी, गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीमध्ये 22.58% वाढ
Gold Rate Today
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम चालू खात्यातील तूट (CAD) वर होतो. वाणिज्य मंत्रालयाच्या (Finance Ministry) आकडेवारीनुसार वाढत्या देशांतर्गत मागणीमुळे सोन्याची आयात वाढली आहे. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षात चांदीची आयात 71 टक्क्यांनी घसरून 791 दशलक्ष डॉलर्सवर आली. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सोन्याची आयात 28.23 अब्ज डॉलर्स होती. सोन्याच्या आयातीमध्ये वाढ असूनही गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या व्यापारात घट होऊन 98.56 अब्ज डॉलरवर गेला. 2019-20 मध्ये हा व्यापार 161.3 अब्ज डॉलर्स होता. (Strong buying of gold even during the Corona period, 22.58% increase in gold imports in the last financial year)

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढते

रत्न व ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिल (GJEPC)चे अध्यक्ष कोलिन शहा म्हणाले की वाढत्या देशांतर्गत मागणीमुळे सोन्याची आयात वाढत आहे. शहा म्हणाले की, अक्षय्य तृतीया आणि लग्नाच्या सिझनमुळे सोन्याची आयात आणखी वाढू शकते. यामुळे चालू खात्यातील तूटही वाढेल. परदेशी चलन देशात येते आणि येथून निघून जाते या दोन क्रियेतील अंतराला सीएडी(CAD) असे म्हणतात.

सोन्याची आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश

भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. मुख्यतः दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. गेल्या आर्थिक वर्षात रत्ने व दागिन्यांची निर्यात 25.5 टक्क्यांनी घसरुन 26 अब्ज डॉलरवर गेली. भारत प्रमाणानुसार दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 12.5 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे नवीन नियम 1 जूनपासून लागू

आता देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्किंग करणे आवश्यक आहे. हा नियम 1 जून 2021 पासून संपूर्ण देशात लागू होईल. केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये म्हटले होते की सोन्याच्या दागिन्यांवरील अनिवार्य हॉलमार्किंग 15 जानेवारी 2021 पासून अंमलात येईल, परंतु कोरोना महामारीमुळे सरकारने याची तारीख 1 जून 2021 पर्यंत वाढविली. गोल्ड हॉलमार्किंग शुद्धतेचा पुरावा मानली जाते आणि सध्या हे ऐच्छिक आहे. (Strong buying of gold even during the Corona period, 22.58% increase in gold imports in the last financial year)

इतर बातम्या

लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले

Work From Home साठी लॅपटॉप घेताय? मग ‘हे’ 5 स्वस्त आणि दमदार लॅपटॉप्स जरुर पाहा