Nifty ची राघो भरारी; शेअर बाजारात मंगल मंगल हो, सेन्सेक्सने पण दाखवली कमाल

Nifty All Time High : भारतीय शेअर बाजाराने गेल्या एका महिन्यात निच्चांकावरुन उच्चांकाकडे भरारी घेतली आहे. राघोबाने अटकेपार झेंडा रोवला तशी निफ्टीने राघो भरारी घेतली आहे. आता थोड्याच वेळापूर्वी निफ्टीने जोरदार कामगिरी करुन दाखवली. सेन्सेक्सची पण घौडदौड सुरुच आहे.

Nifty ची राघो भरारी; शेअर बाजारात मंगल मंगल हो, सेन्सेक्सने पण दाखवली कमाल
तर प्रसिद्ध एफएमसीजी ITC वर Sharekhan ने खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टार्गेट प्राईस 550-615 रुपये ठेवण्यात आली आहे. 505-515 रुपये खरेदीची किंमत तर 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 3:04 PM

एका महिन्यात शेअर बाजाराने मोठी कामगिरी बजावली. निच्चांकाकडून उच्चाकांकडे घौडदौड केली. न अडखळता मोहिम सुरुच आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या मुलूखगिरीने सर्वच विस्मयचकित झाले आहेत. गुंतवणूकदारांना पण हर्षवायू झाला आहे. बजेट 2024 पूर्वी शेअर बाजार अजून किती विक्रम नावावर करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी शेअर बाजाराने पुन्हा एकदा धमका केला. मंगळवार स्टॉक मार्केटसाठी शुभ ठरला. NSE Nifty आज नवीन ऐतिहासिक शिखरावर पोहचला. निफ्टीने आज 99.15 अंकांची चढाई केली. निफ्टी त्याच्या 24,419.70 या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे.

सेन्सेक्समध्ये 400 अंकांची उसळी

सेन्सेक्स पण 403 अंकांनी उसळला आणि तो 80,363.69 अंकांच्या स्तरावर पोहचला. त्याने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 80,392.64 पासून अगदी जवळ आहे. दुपारी 1.15 वाजता सेन्सेक्स 385.97 अंकांनी वधारला. तो 80,346 अंकावर पोहचला. त्यानंतर त्यामध्ये दहा अंकांची घसरण दिसली.

हे सुद्धा वाचा

निफ्टीच्या 50 शेअरची कामगिरी

एनएसई निफ्टीच्या 50 मधील 33 शेअरमध्ये उसळी दिसली. तर 17 शेअर्समध्ये घसरण दिसली. मारुतीचा शेअर 7 टक्क्यांनी उसळला. यासोबतच आयटीसी, एमअँडएम, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटनच्या शेअरमध्ये पण तेजीचे सत्र दिसले. तर एलटीआय मायट्री, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि बीपीसीएलचे शेअर घसरले.

सेन्सेक्सच्या शेअरची अपडेट

सेन्सेक्समध्ये पण मारुती सुझुकी इंडिया कंपनीने आघाडी घेतली. या कंपनीचा शेअर 6 टक्क्यांनी वधारला. तर आयटीसी, महिंद्री अँड महिंद्रा, टायटन, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्सच्या शेअरने झेप घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि महिंद्राच्या शेअरला फटका बसला.

जागतिक बाजाराची काय घडामोड

आशिया बाजारातील चीनच्या शंघाई कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानमधील निक्केईमध्ये तेजीचे सत्र दिसले. तर काल अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाला. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड वायदा बाजारात घसरण दिसली. शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली. त्यांनी 60.98 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजार अजून चुणूक दाखविण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.