Share Market : छप्परफाड कमाई! Tata Motors, Titan सह हे शेअर पण टॉपवर

Share Market : शेअर बाजारात या शेअर्संनी सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या 52 आठवड्यात त्यांनी उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Share Market : छप्परफाड कमाई! Tata Motors, Titan सह हे शेअर पण टॉपवर
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली : उत्साहवर्धक जागतिक संकेत आणि जोरदार जीडीपी आकड्यांच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने पुन्हा झेप घेतली आहे. बाजारात तेजीचे सत्र आहे. बीएसईवर (BSE) 169 शेअर्सनी शुक्रवारी कमाल केली. व्यापारी सत्रात 52 आठवड्यात या शेअर्संनी धमाल केली. त्यांनी गुंतवणूकदारांना एकदम मालामाल केले. या शेअर्समध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप मधील सर्व शेअर आहेत. एकूण 169 शेअर्समध्ये 19 लार्जकॅप स्टॉक आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors), टायटन (Titan), पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (Power Finance Corporation), डीएलएफ (DLF), इंडियन हॉटेल्स (Indian Hotels), बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि ब्रिटानिया (Britannia) यांचा समावेश आहे. याशिवाय या यादीत मॅनकाईंड फार्मा (Mankind Pharma) या शेअरचाही समावेश आहे.

मिडकॅपमध्ये हे स्टॉक जोरदार मिडकॅप स्टॉक्समध्ये साएंट (Cyient), टीटागढ वॅगन्स (Titagarh Wagons), जेंसर टेक (Zensar Tech), केपीआईटी टेक्नॉलॉजीज (KPIT Technologies), मिंडा कॉर्प (Minda Corp), केईआई इंडस्ट्रीज (KEI Industries), मेट्रो ब्रँड्स (Metro Brands), ट्रेंट (Trent) आणि पॉलीकॅब इंडिया (Polycab India) या शेअर्संनी शुक्रवारी कमाल केली, 52 आठवड्यातील सर्वोच्च कामगिरी बजावली. आदित्या बिर्ला कॅपिटल (Aditya Birla Capital) या शेअरमध्ये व्यापारी सत्रात 3 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. कंपनीच्या मंडळाने प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुप कंपनीला 1250 कोटींचा प्रीफेरेंशियल इश्यू जारी करण्यास मंजुरी दिली.

टायटनचे तुफान उद्योगपती रतन टाटा यांच्या समूहातील टायटन (Titan) कंपनीच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास होता. टायटनने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या कंपनीने मोठा परतावा मिळून दिला. बीएसईवर मंगळवारी हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर होता. परतावा देण्यात पण या शेअरने विक्रम नोंदवला. हा शेअर 2841.90 रुपयांवर पोहचला. आज 11:24 वाजता हा शेअर 2,807 रुपयांवर आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

233 कोटींचा फायदा जानेवारी ते मार्च 2023 तिमाहीत टायटन कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनावाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,69,45,970 शेअर आहे. टायटन कंपनीत त्यांचा 5.29 टक्के वाटा आहे. टायटन यांच्या कंपनीचा प्रति शेअर 49.70 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांना 2,33,32,14,709 रुपये म्हणजे जवळपास 233 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.