Sucess Story : घरोघरी जाऊन वाटले वृत्तपत्र, आज उभी केली कोट्यवधींची कंपनी, सीड नायडूचं नाव ऐकलंय कधी

Success Story : कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आज मात्र त्यांची कोट्यवधींची कंपनी आहे. स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या या तरुणाची अशी आहे यशोगाथा..

Sucess Story : घरोघरी जाऊन वाटले वृत्तपत्र, आज उभी केली कोट्यवधींची कंपनी, सीड नायडूचं नाव ऐकलंय कधी
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 1:52 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही सातत्य ठेवलं तर एक दिवस यश तुम्हाला शोधत येतं असे म्हणतात. तुम्हाला यश मिळते. पण त्यासाठी अगोदर अनेक टप्पे टोणपे खावे लागतात. अनेकदा अडचणीचे डोंगर कोसळतात. अनाहूत समस्या डोकावतात. पण जो अढळ असतो. जो रस्ता सोडत नाही, अशा चिकाटीबाजला त्याचा रस्ता सापडल्याशिवाय राहत नाही. ही यशोगाथा आहे सीड नायडू (Sid Naidu) या असामान्य तरुणाची. अगदीच सामान्य असलेला सीड आज कोट्याधीश आहे. पण कधीकाळी या तरुणाने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटपाचं काम केलं. आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्यासाठी तो परिस्थितीसी झुंजला. त्याने स्वतःचा रस्ता जोखला. त्यावर तो टिकला आणि आज तो कोट्यवधी कंपनीचा मालक आहे. संघर्षातून त्याने ही यशोगाथा लिहिली आहे.

कोण आहे सीड नायडू​ कधीकाळी संघर्षाच्या गर्तेत अडकलेल्या सीड नायडूला आज ओळखीची गरज नाही. सीड प्रोडक्शन या नावाने त्याची मोठी कंपनी आहे. त्याने संकटाशी सामना केला. चिकाटी ठेवली. बेंगळुरुत सीड नायडू, सीड प्रोडक्शन नावाने ॲडव्हर्टायझिंग आणि मीडिया प्रोडक्शन हाऊस चालवतो.

कोट्यवधींचा टर्नओव्हर त्याचे प्रोडक्शन हाऊसकडे आज जगातील नामवंत कंपन्या आणि ब्रँड शूट आणि मार्केटिंग कॅम्पेन चालवतात. त्याच्या प्रोडक्शन हाऊसची कोट्यवधींची उलाढाल आहे. आताच त्याच्या कंपनीने 4 कोटींच्या घरात उलाढाल केली. कोट्यवधींचा टर्नओव्हर करणाऱ्या सीडला शिक्षण मात्र इयत्ता दहावीपर्यंतच पूर्ण करता आले.

हे सुद्धा वाचा

वृत्तपत्र वाटून उदरनिर्वाह 2007 मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबाची जबाबदारी सीडच्या खाद्यांवर येऊन पडली. त्याची आई दरमहा केवळ 1500 रुपये कमावत होती. आईच्या मदतीसाठी सीडने घरोघरी जाऊन वृत्तपत्र विक्रीचे काम सुरु केले. त्यातून त्याला 250 रुपये महिना मिळत होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे सीडला पुढील शिक्षणाचा खर्च करता येणे अशक्य होते. दहावी झाल्यानंतर सीडने एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून नोकरी सुरु केली. त्यावेळी त्याचा पगार 3000 रुपये होता.

स्वप्नांचा पाठलाग सीड कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याची तयारी करत होता. फॅशन इंडस्ट्रीजकडे त्याचे लक्ष वेधले. त्याने ऑफिस बॉयची नोकरी सोडली आणि एका कॉफी हाऊसमध्ये वेटर झाला. त्यानंतर एका मॉलमध्ये नोकरी केली. याठिकाणी फॅशनेबल कपडे, त्यांचे मार्केटिंग, इवेंट मॅनेजमेंट याची त्याला माहिती मिळाली. फॅशनच्या जगाशी त्याचा परिचय झाला. याच क्षेत्रात पुढे करिअर करायचे त्याने ठरवले.

स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल दरम्यान सीडला ॲड शूटची ऑफर आली. पण त्यासाठी त्याला स्वतःची कंपनी आवश्यक होती. त्याच्याकडे दोन लाख रुपये होते. पाच लाखांची गरज होती. त्याने मित्र, नातेवाईक यांच्याकडून लाजत काजत तीन लाख रुपये उसणे घेतले, ते लागलीच परत करण्याच्या बोलीवर. त्याने शब्द पाळला. मोठ्या कष्टाने त्याने सीड प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली.

कोट्यवधींचा टर्नओव्हर सीडचा पहिला प्रोजेक्ट फॅशन ईकॉमर्स कंपनी Myntra साठी होता. त्यानंतर त्याच्याकडे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, चुंबक, ग्लोबल देशी, युएस पोलो, वीवो, डाबर, फ्लाईंग मशीन सहित अनेक कंपन्या आल्या. त्यांचे फॅशन शूट, स्टोअर लॉचिंग आणि इवेंट्सचे काम सीड प्रोडक्शनाला मिळाले. त्याने आता एक वेडिंग प्लॅनर कंपनी सुरु केली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.