Government Scheme | या सरकारी योजनेत बंपर रिटर्न; कर देण्याची पण नाही झंझट
Government Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित होत आहे. अनेक पालकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेत 70 लाख रुपयांपर्यंतची कमाई होते. योजनेत गुंतवणूकदारांना कर सवलतीचा लाभ पण मिळतो.
नवी दिल्ली | 17 February 2024 : केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविते. त्यात अनेक गुंतवणूक योजनांचा पण समावेश आहे. यामध्ये जोरदार परताव्यासह कर सवलतीचा लाभ ही मिळतो. सरकारची ही योजना देशाच्या लाडक्या लेकींसाठी फायदेशीर आहे. या योजनेत मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होते. या योजनेत गुंतवणूकदारांना 70 लाखांपर्यंत परतावा मिळेल. ही योजना सुरु झाल्यापासून ती लोकप्रिय ठरली आहे. या योजनेला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही मोदी सरकारने सरु केलेली योजना आहे. यात लाडक्या लेकीच्या नावाने गुंतवणूक करता येते. ही एक कर मुक्त अल्पबचत योजना आहे. जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी या योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत प्रत्येक महिन्याला 250 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळेल. योजनेच्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागत नाही.
कोण उघडू शकते खाते
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीसाठी पालकांना खाते सुरु करता येते. 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करता येते. तुम्ही मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेत जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे खाते उघडता येते. जुळ्या मुली असतील तर ही संख्या तीन होऊ शकते.
70 लाख रुपयांपर्यंत परतावा
- जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्षाच्या वयात आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडले तर पुढील 14 वर्षे किंवा मुलीच्या वयाच्या 15 वर्षांपर्यंत खात्यात गुंतवणूक केली जाईल. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर खाते मॅच्युअर होईल आणि तिला ही भलीमोठी रक्कम मिळेल. मुलीच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येते. नियमानुसार, मुलगी सज्ञान झाल्यावर ही रक्कम काढता येते. जर वयाच्या 18 व्या वर्षी रक्कम काढली नाही तर वयाच्या 21 वर्षी मोठी रक्कम मिळेल.
- सुकन्या समृद्धी योजनेत दर तीन महिन्याला बदल होतो. या योजनेच्या सुरुवातीला सर्वाधिक 9.2 टक्के व्याज तर सर्वात कमी 7.6 टक्के व्याज मिळाले. या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे. समजा सरासरी 8 टक्के दराने 15 वर्षांपर्यंत तुम्ही 1.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी जमा केल्यास जवळपास 70 लाख रुपये रिटर्न मिळेल.