Penny Stock : 10 पैशांवरुन 2 रुपयांवर आला हा पेनी शेअर, चार वर्षांत एक लाखांचे केले 24 लाख, हा स्टॉक किती बाजी मारणार?
Penny Stock : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक आहेत. त्यातील काही दमदार कामगिरी बजावत आहेत. या कंपन्यांचे फंडामेंटल पण चांगले आहेत. त्यातच या कंपनीचा शेअर सध्या चर्चेत आहेत. आज हा शेअर 4.2 टक्के वधारला. तो सध्या 2.45 रुपयांवर इंट्रा डे उच्चांकावर होता.
सनशाईन कॅपिटलचा शेअर आज बुधवारी व्यापारी सत्रात चर्चेत राहिला. कंपनीचा शेअर आज 4.2 टक्क्यांनी वधारला. तो 2.45 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. या पेनी शेअरची ही घौडदौड एका घोषणेने झाली. कंपनी तिच्या परंपरागत व्यवसाया व्यतिरिक्त नवीन उद्योगात उडी घेणार आहे, त्याची घोषणा कंपनीने केली. त्याचा परिणाम शेअरवर लागलीच दिसून आला. या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा करुन दिला आहे. गेल्या चार वर्षात हा शेअर 10 पैशांवरुन 2.45 रुपयांवर पोहचला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
फिनटेक कंपन्यामध्ये जोरदार कामगिरी
सनशाईन कॅपिटलने फिनटेक कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने बुधवारी म्युच्युअल फंड वितरण व्यवसायात पाऊल ठेवण्यास मंजूरी दिली. म्युच्युअल फंड बाजारात क्षमतेने उतरण्याची तयारी कंपनीने केली आहे. नवीन दमासह आणि तंत्रज्ञानासह म्युच्युअल फंड बाजारात पाऊल टाकणार आहे. म्युच्युअल फंडातील अनेक उत्पादनं आणण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शेअरची घौडदौड
या कंपनीचा पेनी शेअर असला तरी त्याची घौडदौड चांगली आहे. एका वर्षात या शेअरने ग्राहकांना जवळपास 365 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या वर्षभरात हा शेअर 49 पैशांवरुन 2.45 रुपयांवर पोहचला आहे. चार वर्षांत हा शेअर 10 पैशांवरुन इथपर्यंत आला आहे. चार वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 2350 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर चार वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाखांची गुंतवणूक 24 लाखांवर गेली असती. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 4.13 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 0.48 रुपये अशी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1,187.02 कोटी रुपये आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.