LIC Policy Close | पॉलिसी सरेंडर करुन मिळवा रक्कम; LIC पॉलिसी बंद करण्याचे हे नियम माहिती आहेत का?

LIC Policy Surrender News | LIC ची पॉलिसी (policy) सरेंडर (surrender) करायची म्हणताय, मग हे नियम माहिती करुन घ्याच

LIC Policy Close | पॉलिसी सरेंडर करुन मिळवा रक्कम; LIC पॉलिसी बंद करण्याचे हे नियम माहिती आहेत का?
LIC Policy SurrenderImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:30 AM

LIC Policy Closed News | भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) हे भारतीयांच्या पसंतीचं विमा महामंडळ आहे. लाखो भारतीयांनी त्यांचा जीवन विमा या महामंडळाकडून उतरवून घेतला आहे. खासगी कंपन्यांच्या आकर्षक योजना असताना ही भारतीय अद्यापही एलआयसीत गुंतवणुकीस प्राधान्य देतात. अनेक जण एलआयसीत पॉलिसी (LIC Policy News) सुरु करतात. काही दिवस, वर्षे पॉलिसी सुरु राहते. पण काही कारणांमुळे ही पॉलिसी त्यांना सुरळीत चालू ठेवता येत नाही. त्यात खंड पडतो, व्यत्यय येतो. अनेक जणांना नंतर त्यात रक्कम भरणे अशक्य होते. अशा अनेक खंडीत पॉलिसी आहेत. पण एखाद्याला ही पॉलिसी बंद करायची असेल आणि पूर्ण रक्कम मिळवायची असेल तर त्यासाठी नियम आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास विमाधारकाला (Insurance Holder) त्याची गुंतवणलेली रक्कम परत मिळते. पॉलिसी सरेंडर करताना एलआयसीच्या नियमांनुसार सरेंडर व्हॅल्यू (Surrender Value News) मिळते. जर तुम्हाला एलआयसीची पॉलिसी बंद करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एलआयसी पॉलिसी बंद करताना या नियमांची माहिती विमाधारकाला असणे आवश्यक आहे.

कशी कराल पॉलिसी सरेंडर?

तुम्ही पॉलिसी कशी सरेंडर करू शकता? हा प्रश्न अनेक विमाधारकांना पडतो. त्याचं सर्वप्रथम उत्तर शोधुयात. एलआयसी पॉलिसी सुरु करतानाच एजंट तुम्हाला हा पहिला नियम सांगतो की, तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता. म्हणजे पॉलिसी सुरु केल्यानंतर तुम्ही लगेचच ती बंद केली तर रक्कम बुडीत खात्यात जमा होते. कारण पॉलिसीत कमीत कमी 3 वर्षे रक्कम गुंतवणे आवश्यक असते. त्याअगोदर तुम्ही पॉलिसी बंद केली तर जमा केलेली रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे पॉलिसी काढतानाच तीन वर्षांची तरतूद लक्षात ठेवा. नियमानुसार एलआयसी पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला गुंतवणूक मूल्य (Invest Value) अथवा समर्पण मूल्य मिळेल. पॉलिसी बंद केल्यावर, त्याच्या किमतीएवढी रक्कम परत केली जाते. म्हणून त्याला समर्पण मूल्य म्हणतात. तीन वर्षांसाठी एलआयसी प्रीमियम भरला असेल तर विमाधारकाला गुंतवणूक मूल्या मिळते.

हे सुद्धा वाचा

काय आहे गुंतवणूक मूल्य?

पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यावर, विमा धारकाला तोटा सहन करावा लागतो. परंतू विमाधारकाने सलग 3 वर्षे प्रीमियम भरला तर त्याला गुंतवणूक मूल्य मिळते. पहिल्या वर्षात तुम्ही पॉलिसी बंद केली तर तुम्हाला रक्कम परत मिळणार नाही. उरलेल्या दोन वर्षात पॉलिसी बंद केल्यास एलआयसी नियमांप्रमाणे, 30 टक्के पैसे मिळतील.

पॉलिसी बंद करणे एकदम सोप्पं

विमाधारकाला जीवन विमा योजना बंद करायची असल्यास त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. विमाधारकाला LIC सरेंडर फॉर्म आणि NEFT फॉर्म भरुन द्यावा लागेल. या अर्जासोबत विमाधारकाला पॅन कार्डची प्रत आणि पॉलिसीची मूळ कागदपत्रे जोडावी लागतील. यासोबतच तुम्हाला पॉलिसी बंद करायचं कारण ही स्पष्ट करावे लागेल.

जोडा ही आवश्यक कागदपत्रे

  1. 1 मूळ पॉलिसी बाँड दस्तऐवज 2 LIC पॉलिसी सरेंडर फॉर्म क्रमांक 5074 एलआयसीच्या संकेतस्थळावरुन फॉर्म डाउनलोड करा 3 बँक खात्याचे तपशील द्या 4 LIC चा NEFT फॉर्म (जर तुम्ही सरेंडर फॉर्म वापरत नसाल तर) 5 आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्डची सत्यप्रत
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.