बचत सोडा, सलग तिसऱ्या वर्षी कर्जावरच सर्व कारभार

India Debt : कोरोनानंतर देशात जगण्यासाठी मोठी लढाई सुरु आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता एका आकडेवारीनुसार, बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी वाढले आहे तर बँकेत ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या सातत्याने घसरत आहे.

बचत सोडा, सलग तिसऱ्या वर्षी कर्जावरच सर्व कारभार
कर्ज चढले डोईवर, बचत तर काही होईना
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 3:35 PM

महागाईने भारतीयांच्या आयुष्यातील आनंद हिरावला गेला आहे. या 10 वर्षांत विशेषतः कोरोनानंतर दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू कित्येक पट्टीने वाढल्या आहेत. महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जगण्यासाठी पण अनेकांन कर्ज काढावे लागत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीयांच्या आर्थिक सवयी बदलल्याचे समोर आले आहे. भारतीय कुटुंबिय पूर्वी बचतीवर भर देत होते. पण आता त्यांना कर्ज काढावे लागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत बचती करणाऱ्यांपेक्षा कर्ज घेणाऱ्यांचा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे.

भारतीयांनी केली इतकी बचत

मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या इकोस्कोपच्या अहवाला आधारे बिझनेस स्टँडर्डने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत भारतीय कुटुंबिय बँकेत पैसा जमा करण्याऐवजी बँकेकडून उधार घेत आहेत. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या 9 महिन्यात म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2023 या दरम्यान भारतीयांनी जी रक्कम बँकांमध्ये जमा केली ती देशाच्या जीडीपीच्या 4.5 टक्के इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

9 महिन्यात घेतले इतके कर्ज

या अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान भारतीयांनी बँकांमध्ये जीडीपीच्या 4.9 टक्के कर्ज घेतले आहे. म्हणजे भारतीयांची बचतीची सवय कमी होऊन कर्ज घेण्याची सवय वाढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा ट्रेंड सुरु आहे. ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कर्ज घेण्याचा रेकॉर्ड

भारतीय कुटुंबियांच्या एकूण कर्जाच आकडा पाहता आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचा अंदाज येतो. या अहवालानुसार, डिसेंबर 2023 मध्ये भारतीय कुटुंबावर बँकेचे एकूण कर्ज वाढले आहे. कर्ज घेण्याचे प्रमाण विक्रम स्तरावर पोहचले आहे. एकूण कर्ज जीडीपीच्या 40 टक्क्यांवर पोहचले आहे. तर बचत करण्याचे प्रमाण सर्वकालीन निच्चांकावर आले आहे.

या कारणांमुळे कर्जाचा वाढता डोंगर

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, भारतीय कुटुबांची बँकेतील ठेव दिवसागणिक कमी होत आहे. तर कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे उत्पन्नाचे प्रमाण कमी, दैनंदिन वस्तूंची महागाई हे एक आहे. अनेक जण बँकेत बचत करण्याऐवजी, ठेव ठेवण्याऐवजी हा पैसा म्युच्युअल फंड, शेअर बाजाराकडे वळवत आहे. त्यामुळे पण ठेवीचे आकडे कमी झाले आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....