Patanjali | गुंतवणूकदारांसाठी पंतजलीचा मनीमंत्रा, बाजारात 4 IPO आणणार..पुन्हा कमाईचा योग !

Patanjali | योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली ग्रुपला बिझनेस योग साधायचा आहे. शेअर बाजारात दबदबा निर्माण करण्यासाठी कपंनी 4 IPO आणणार आहे.

Patanjali | गुंतवणूकदारांसाठी पंतजलीचा मनीमंत्रा, बाजारात 4 IPO आणणार..पुन्हा कमाईचा योग !
4 आयपीओचा योगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 2:30 PM

Patanjali | योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या पतंजली ग्रुपला बिझनेस योग साधायचा आहे. येत्या 5 वर्षांत पतंजलीचे (Patanjali) देशभरात 1 लाख कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य आहे. यामाध्यमातून कंपनी 5 लाख लोकांना रोजगार (Employment) देण्याच्या तयारीत आहे. तर शेअर बाजारातही दबदबा निर्माण करण्यासाठी कपंनी 4 IPO आणणार आहे.

Patanjali Ayurveda साठी कंपनी 4 नवीन आयपीओ घेऊन येत आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांना पुन्हा कमाईची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

खाद्य तेलात देशाला स्वंयपूर्ण करण्यासाठी स्वामी रामदेव यांनी कंबर कसली आहे. कंपनी 15 लाख एकरवर पामची शेती करणार आहे. त्यामाध्यमातून 5 लाख कोटींचे बाजार भांडवल उभारणीची तयारी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या 7 वर्षात कंपनी 1 लाख कोटींची उलाढाल करणार आहे. सध्या पतंजली कंपनीची उलाढाल 40,000 कोटी रुपये आहे. हा व्यवसाय वाढवण्याचा मानस कंपनीचा आहे. त्यासाठी नवनवीन व्यवसायात कंपनी पाऊल टाकणार आहे.

पतंजली ग्रुपचे 4 आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये Patanjali Ayurveda, Patanjali Medicine, Patanjali Wellness आणि Patanjali Lifestyle यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात दाखल होतील.

या कंपन्यांचे आयपीओ बाजारात सुचीबद्ध करण्याचे काम कंपनीने सुरु केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल. यापूर्वी ही गुंतवणूकदारांनी कमाईचा योग साधला आहे. आता त्यांना पुन्हा या आयापीओतील गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

पतंजली ग्रुपने 5 कंपन्यांच्या 5 लाख कोटींच्या मार्केट कॅपसाठी कंबर कसली आहे. लवकरच याविषयीच्या विस्ताराची आणि अन्य योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याआधारे बाजारातील विदेशी कंपन्यांना टप फाईट देण्याचा विचार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.