Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 जूनपूर्वी अपडेट करा IFSC कोड, ‘या’ सरकारी बँकेकडून अलर्ट जारी

येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड (IFSC Code) बंद करण्यात येणार आहे. (Syndicate Bank IFSC Codes Disabled)

30 जूनपूर्वी अपडेट करा IFSC कोड, 'या' सरकारी बँकेकडून अलर्ट जारी
bank-customeया दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण झाल्यानंतर त्याचा ग्राहकांवर काही विशेष परिणाम होणार नाही. या बँकेच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरु असतील. rs
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 7:37 AM

मुंबई : जर तुमचेही कॅनरा बँकेत खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून सिंडिकेट बँकेचा आयएफएससी कोड (IFSC Code) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांनी येत्या 30 जूनपर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड अपडेट करावा, असे आदेश कॅनरा बँकेने दिले आहेत. (Syndicate Bank IFSC Codes Will Be Disabled From 1 July 2021)

काही महिन्यांपूर्वी कॅनरा बँकेचं सिंडिकेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले. यानंतर सिंडिकेट बँकेने केलेल्या ट्वीटनुसार, SYNB पासून सुरु होणारे eSyndicate IFSC कोड बदलण्यात आले आहेत. SYNB ने सुरु होणारे सर्व IFSC W.E.F 01.07.2021 पासून बंद करण्यात येतील.

सिंडिकेट बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही NEFT/RTGS/IMPS पाठवताना केवळ CNRB ने सुरु होणारा नवीन आयएफसी कोडचं वापरावा, अशी विनंती ग्राहकांना केली आहे.

1 एप्रिलपासून जुने कोड बंद

गेल्या एप्रिल 2020 पासून अनेक बँकांचे विलीनीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत नवीन IFSC आणि MICR कोड जारी केले आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व जुन्या बँकांचे आयएफसी कोड 1 एप्रिल 2021 पासून बंद केले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याद्वारे व्यवहार करता येणार नाही.

10 बँकांचे विलिनीकरण

भारत सरकारने बँकाच्या एकत्रीकरण योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण योजना तयार केली होती. यानुसार 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांना राज्याच्या मालकीच्या बँकांमध्ये विलीन करण्याची घोषणा केली. एप्रिल 2020 पासून हे विलीनीकरण अमलात आले.

यानंतर गेल्या 1 एप्रिल 2021 पासून आयएफएससी आणि एमआयसीआर कोड अद्ययावत करण्याचे काम सुरु झाले. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली होती. विजया बँक आणि देना बँक 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या. या खातेदारांचे आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलण्यात येणार आहे. मात्र अद्याप तरी या बँकांनी ग्राहकांना याबाबतची माहिती दिलेली नाही.

IFSC कोड म्हणजे काय?

कोणत्याही ऑनलाईन व्यवहारांसाठी बँक खाते क्रमांकासह बँकेचा आयएफएससी कोड असणे अनिवार्य आहे. बँकांचा आयएफएससी कोड हा 11 अंकांचा असतो. यात सुरुवातीची चार अक्षरे हे बँकेचे नाव दर्शवितात. IFSC कोडचा वापर NEFT आणि RTGS साठी केला जातो. (Syndicate Bank IFSC Codes Will Be Disabled From 1 July 2021)

संबंधित बातम्या : 

आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत

NPS गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी, तुम्हीही गुंतवणूक केलीय, मग हे वाचाच

44 कोटी ग्राहकांना SBI योनो अॅपवर मिळणार नवी सेवा, असा होणार फायदा

कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्..
कराड फिल्म प्रोड्यूसर? निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा अन्...
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट.
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्...
बीडच्या मशिदीत स्फोट, रात्री अडीचच्या सुमारास मोठा आवाज अन्....
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर...
'काका आहे का गं?' बोलणाऱ्या कावळ्याची एकच धूम, बघा tv9 मराठीवर....
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.