नवी दिल्ली : गेल्या जवळपास 30 वर्षांपासून थम्सअप (Thumps Up), गोल्ड स्पॉट (Gold Spot), लिम्का (Limca) आणि कोका कोला (Coca-Cola) यासारख्या सॉफ्ट ड्रिंकची विक्री बिसलेरी (Bisleri) कंपनी करत आहे. आता ही कंपनी टाटा समूहाच्या (Tata Group) मालकीची होत आहे. या डीलमुळे बाजारात अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. काहींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका मोठा उद्योग समूह ताफ्यात आल्याने टाटाचा बाजार पेठेतील शेअर वाढला आहे.
बिसलेरी इंटरनॅशनल (Bisleri International) आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड (Tata Consumer Products Ltd, TCPL) यांच्यातील ही डील जवळपास 6000 ते 7000 कोटींची होण्याचा अंदाज आहे.
ही डील एकाएकी झालेला नाही. दोन्ही समूहांमध्ये या डीलसाठी चर्चेच्या अनेक फेरी झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या डीलसाठी दोन्ही समूहात गेल्या दोन वर्षांपासून बैठकी सुरु होत्या. त्यानंतर या डीलवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
बिसलेरी हा ब्रँड जयंतीलाल चौहान (Jayantilal Chauhan) यांच्या मालकीचा आहे. त्यांनी 1984 साली सीलबंद पाण्याचा हा व्यवसाय सुरु केला होता. सध्याचे संचालक रमेश जे चौहान (Ramesh J Chauhan) यांचे वय 82 वर्ष आहे.
अन्य उद्योजकही बिसलेरी खरेदी करण्यासाठी इच्छुक होते. पण टाटाची संस्कृती आणि मूल्य हे आपल्याला मनापासून आवडतात. त्यामुळे टाटा समूहाला हा ब्रँड विक्री करत असल्याची भावनिक प्रतिक्रिया चौहान यांनी दिली.
टाटा समूह बिसलेरीचा आणखी विस्तार करतील. नवीन व्यावसायिक संधी शोधतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिसलेरी विक्रीचा निर्णय जड अंतकरणाने घेत असल्याचे त्यांनी सांगतिले.
कंपनी विक्रीतून आलेल्या पैशांसंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीने हा ब्रँड तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच अशाच समूहाला बिसलेरीची विक्री करण्यात आली, जो कंपनी आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टाटा कंझ्युमर आणि बिसलेरी यांच्यात झालेल्या करारानुसार, बिसलेरीचे व्यवस्थापन आणखी दोन वर्षे कंपनीचे व्यवस्थापन सांभाळणार आहे. एका मुलाखतीत, चौहान यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.
टाटा सन्सचे संचालक एन चंद्रशेखरन ( N Chandrasekaran) आणि टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसूजा ( Sunil D’Souza ) यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर बिसलेरी समूहाची मालकी टाटाकडे देण्याचा निर्णय घेतल्याचे चौहान यांनी सांगितले.