Tata चा एक निर्णय आणि सर्वात मोठ्या कंपनीचे 2 मिनिटांतच बुडाले 45 हजार कोटी

Tata Sons | टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी कंपनीचा शेअर 2.72 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 4032.20 रुपयांवर व्यापार करत आहे. तर कंपनीचा शेअर व्यापारी सत्रात दोन मिनिटांतच 4021.25 रुपयांवर आला होता. त्यात सकाळी 10:39 वाजता 4,019 रुपयांवर व्यापार करत होता.

Tata चा एक निर्णय आणि सर्वात मोठ्या कंपनीचे 2 मिनिटांतच बुडाले 45 हजार कोटी
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 10:56 AM

नवी दिल्ली | 19 March 2024 : रतन टाटा यांच्या सर्वात मोठ्या कंपनीत पडझड झाली. मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. कंपनीचे मार्केट कॅप दोन मिनिटांतच जवळपास 45 हजार कोटी रुपयांनी स्वाहा झाले. एक अहवालानुसार, टाटा सन्स, टीसीएसमधील आपला वाटा कमी करण्याची तयारी करत आहे. कंपनीने जवळपास 9300 कोटी रुपयांच्या शेअरच्या विक्रीची योजना केली आहे. 3.6 टक्क्यांच्या सवलतीसह कंपनी शेअर विक्री करणार आहे. त्याचा फटका आज कंपनीच्या शेअरवर दिसून आल्या. सध्या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. आज सकाळी 10:39 वाजता 4,019 रुपयांवर व्यापार करत होता. त्याअगोदर हा शेअर 4032.20 रुपयांवर व्यापार करत होता.

टीसीएसच्या शेअरची पडझड

मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी कंपनीचा शेअर 2.72 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 4032.20 रुपयांवर व्यापार करत आहे. अवघ्या दोन मिनिटांत हा शेअर 4021.25 रुपयांवर आला. एक दिवसांपूर्वी कंपनीचा शेअर 4144.75 रुपयांवर बंद झाला होता. तर आज सकाळी हा शेअर 4055.65 रुपयांवर उघडला होता.

हे सुद्धा वाचा

कंपनीचे मार्केट कॅप आले खाली

टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. त्यात आज जवळपास 46 हजार कोटी रुपयांची घसरण दिसून आली. आकड्यांनुसार, कंपनीचा शेअर निच्चांकीस्तरावर आला. कंपनीचे मार्केट कॅप 14,54,923.43 कोटी रुपयांवर आला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 14,63,534.49 कोटी रुपयांवर आले.

शेअर बाजारात घसरण

तर गेल्या आठवड्यातही बाजाराने ग्राहकांना दिलासा दिला नाही. या आठवड्यातही बाजाराची चाल तिरकीच आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी जवळपास 300 अंकांनी घसरला. हा निर्देशांक 72,441.89 अंकांवर व्यापर करत होता. तर व्यापारी सत्रात सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी घसरला. हा शेअर 72,316.09 अंकावर पोहचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक निफ्टीत ही 100 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. सध्या निफ्टीत 22000 अंकाहून घसरुन 21,947.40 अंकावर व्यापार करत आहे. या व्यापारी सत्रात निफ्टी 21,922.05 अंकांच्या निच्चांकावर पोहचला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.