Tata Technologies IPO : गरिबीला करा ‘टाटा’! कमाईचा मिळणार मोका, 18 वर्षांनी Tata समूहाचा येणार IPO

Tata Technologies IPO : टाटा टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. आता गुंतवणूकदारांना लवकरच कमाईचा मोका मिळणार आहे. 18 वर्षांनी ही संधी मिळत आहे.

Tata Technologies IPO : गरिबीला करा 'टाटा'! कमाईचा मिळणार मोका, 18 वर्षांनी Tata समूहाचा येणार IPO
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:40 AM

नवी दिल्ली : रतन टाटा यांचा टाटा समूह (Tata Group) हा भारतातीलच नाही तर जगातील सर्वात विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. आता टाटा समूहातून तुम्हाला कमाईचा आणखी एक मोका मिळणार आहे. जर तुम्ही आयपीओत (IPO) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला लवकरच संधी मिळणार आहे. टाटा समूहातील ही कंपनी 18 वर्षांनी बाजारात आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्सची (Tata Motors) उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीज हा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (Tata Technologies IPO) घेऊन येत आहे. गुरुवारी सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) याविषयीचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले आहे. टाटा मोटर्सने याविषयीची माहिती दिली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर सेल (OFS) असेल. याअंतर्गत कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि सध्याचे प्रमोटर्स 9.57 कोटी शेअर्सची विक्री होणार आहे. माहितीनुसार, टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.

टाटा समूह जवळपास 18 वर्षानंतर आयपीओ लाँच करणार आहे. यापूर्वी कंपनीने 2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आता टाटा टेक्नॉलॉजी लवकरच शेअर बाजारात एंट्री करणार आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. आता गुंतवणूकदारांना लवकरच कमाईचा मोका मिळणार आहे. 18 वर्षांनी ही संधी मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

आयपीओ बाजारात आणण्यासाठीची सर्व कवायत पूर्ण झाली असून याविषयीची तारीख आणि इतर महत्वपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल. रतन टाटा समूहाचे संचालक होते, तेव्हा आयपीओ आला होता. आता टाटा सन्सचे सध्याचे संचलाक एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात ग्रुपचा पहिला आयपीओ येणार आहे.

टाटा सन्सचे संचालक म्हणून एन. चंद्रशेखरन 2017 पासून जबाबदारी संभाळत आहेत. अहवालानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ (Tata Technologies IPO) या वर्षाच्या 2023 च्या शेवटी अथवा 2024 मध्ये कोणत्याही वेळी बाजारात दाखल होऊ शकतो. टाटा समूहाच्या एकूण 100 उपकंपन्या आहेत. तर शेअर बाजारात त्यातील केवळ 29 कंपन्या सूचीबद्ध आहेत. टाटा टेकमध्ये टाटा मोटर्सची 74.42 टक्के वाटा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज एक ग्लोबल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिजिटल सर्व्हिस फर्म आहे.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...