Ratan Tata : आरारा खतरनाक! काय परतावा दिला राव, टाटा समूहाच्या शेअरने केले मालामाल

Ratan Tata : या शेअरने बाजाराता तुफान धुमाकूळ घातला. त्यामुळे गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला. टाटा समूहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना तगडा लाभांश पण दिला. त्यामुळे एकाच वेळी अनेक फायदे गुंतवणूकदारांना मिळाले.

Ratan Tata : आरारा खतरनाक! काय परतावा दिला राव, टाटा समूहाच्या शेअरने केले मालामाल
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 7:38 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) पाच हजारांहून अधिक कंपन्या आहेत. पण योग्य कंपनी निवडली तरच तुम्हाला जोरदार फायदा होतो. केवळ चांगले रिटर्न्स मिळतात असे नाही, तर लाभांश पण भरपूर मिळतो. काही शेअर तर गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार परतावा देतात. काही वर्षांतच गुंतवणूकदार कोट्याधीश होतात. पण कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणुकीपूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या. त्याचा अभ्यास करा. बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. नंतर गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू शकतो. टाटा समूहाचा (Ratan Tata Group) हा शेअर गुंतवणूकदारांसाठी लॉटरी सारखा धमाकेदार ठरला आहे. या शेअरने एकदम मालामाल केले आहे.

टाटा समूहाच्या काही कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टेन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services Limited) मधील व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. या समूहात खांदे पालट झाला आहे. राजीनामा सत्रानंतर नवीन सीईओ, व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने बाजारात जोरदार कामगिरी बजावली आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना देण्यात येणार आहे.

टीसीएसने लाभांश देण्याची केली घोषणा

हे सुद्धा वाचा

टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. टीसीएसने 352.50 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली. कंपनीने वर्ष 2018 मध्ये 1:1 रेशो मध्ये बोनस दिला. टीसीएसच्या कामगिरीत सुधारणा करण्यात आली आहे. कोरोना काळात कंपनीच्या CAGR मध्ये प्रचंड सुधारणा झाली. 13 टक्क्यांपर्यंत ही सुधारणा झाली. कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ते या सप्टेंबरपर्यंत कंपनीत कार्यरत राहतील.

गुंतवणूकदारांना तगडा परतावा

टीसीएसच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. टीसीएसच्या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 2,538.58 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 27 ऑगस्ट 2004 रोजी कंपनीचा शेअर 120.33 रुपयांपर्यंत पोहचला. त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने वाढ झाली. हा शेअर गेल्या आठवड्यातील व्यापारी सत्रात वधारला. 17 मार्च 2023 रोजी हा शेअर 3175 रुपयांवर बंद झाला.

कंपनीत खांदेपालट

टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन (Rajesh Gopinathan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. त्यांनी के. कीर्तिवासन (K. Krithivasan) यांना कंपनीचे नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे. कंपनीला, संचालक मंडळाला कीर्तिवासन हे नाव नवीन नाही. ते टीसीएसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या कंपनीच्या सर्व बारीकसारीक बाबींविषयी त्यांना माहिती आहे. टीसीएसच्या BFSI सेगमेंटमध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यांनी करिअरची सुरुवातच टीसीएसमधून केली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.