टाटा समूहाच्या या कंपनीने केले मालामाल; 30000 टक्के दिला रिटर्न

Tata Company Share | ट्रेंट लिमिटेडचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 9.57 रुपयांवर शेअर बाजारात व्यापार करत होता. तेव्हापासून या शेअरची घौडदौड सुरुच आहे. टाटा समूहातील या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना 30000 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला आहे.

टाटा समूहाच्या या कंपनीने केले मालामाल; 30000 टक्के दिला रिटर्न
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 10:24 AM

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : शुक्रवारी शेअर बाजारात तेजीचे सत्र होते. टाटा समूहातील कंपनी ट्रेंट लिमिडेटच्या शेअरने 0.43 टक्क्यांची उसळी घेतली. हा स्टॉक 2968 रुपयांवर कारभार करत होता. या कंपनीचे मार्केट कॅप 1.05 लाख कोटी रुपये आहे. टाटा समूहातील ट्रेंट लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 3025 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकावर 1155 रुपयांवर होता. ट्रेंट लिमिटेडच्या शेअरने एका महिन्यात गुंतवणूकदारांना 12%, तर गेल्या 6 महिन्यात 72% तर या वर्षभरात 131 % बंपर रिटर्न दिला आहे. गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करता आली.

अशी घेतली भरारी

ट्रेंट लिमिटेडचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 9.57 रुपयांवर शेअर बाजारात ट्रेड करत होता. त्याची घौडदौड सुरुच आहे. या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 30000 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला आहे. या कंपनीने या दहा वर्षात गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न न दिल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या एका वर्षात ट्रेंट लिमिटेडने गुंतवणूकदारांना 131 टक्क्यांचा परतावा दिला. तर गेल्या 5 वर्षांत ट्रेंट लिमिटेडचा शेअर 361 रुपयांहून सूसाट सुटला. या शेअरने पाच वर्षांत 721 टक्के बंपर रिटर्न दिला.

हे सुद्धा वाचा

एकदाही माघार नाही

ट्रेंट कंपनीने 1,00,000 कोटी रुपयांचे मार्केट कॅप गाठले आहे. त्यामुळे देशातीलच नाही तर परदेशातील गुंतणूकदारांनी पण या कंपनीकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. कोणत्या पण एका वर्षांत ट्रेंट कंपनीने गुंतवणूकदारांन निगेटिव्ह रिटर्न दिला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रेंट लिमिटेडमध्ये टाटा सन्सची 37 टक्के वाटा आहे.

अनेक ब्रँड पंखाखाली

कंपनी रिटेल सेगमेंटमध्ये काम करते. व्हॅल्यू फॅशनपासून ते लग्झरी प्रोडक्टपर्यंत कंपनीकडे अनेक ब्रँड आहेत. यामध्ये वेस्टसाईड आणि त्यासंबंधीची इतर अनेक दर्जेदार ब्रँड आहेत. ट्रेंटने देशभरात 214 वेस्ट साईड स्टोअर उघडली आहेत. देशभरातील 90 शहरामध्ये हे स्टोअर उघडण्यात आली आहे. देशातील 119 शहरात जुडिओच्या 352 स्टोअर आहेत. कंपनीचे उत्पादन पोर्टफोलिओत अनेक उत्पादने आहेत. कंपनी तिच्या सात उपकंपन्यामार्फत कामकाज करते.

असा दिला परतावा

Trent Limited ने 2014 मध्ये गुंतवणूकदारांना 19 टक्के, 2015 मध्ये 18 टक्के, 2016 मध्ये 15 टक्के, 2017 मध्ये 68 टक्के, 2018 मध्ये 8 टक्के, 2019 मध्ये 46 टक्के, 2020 मध्ये 31 टक्के, 21 मध्ये 55 टक्के, 2022 मध्ये 27 टक्के आणि 2023 मध्ये 120 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.