नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : टाटा समूहातील कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला शेअर बाजारात उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून या आयपीओची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा फळाला आली. बुधवारी या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. हा आयपीओ बुधवारी सब्सक्रिप्शनसाठी उघडल्या गेला. आयपीओ बाजारात उघडताच गुंतवणूकदारांनी एकच भाऊ गर्दी केली. तुफान खरेदी झाली. लॉटची विक्री झाली. सुरुवातीच्या एका तासातच हा आयपीओ पूर्णपणे सब्सक्राईब झाला. त्यामुळे शेअर बाजारात त्याची जोरदार लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना तुफान परतावा मिळण्याची संधी आहे.
सामान्य गुंतवणूकदार पण नाहीत मागे
केवळ एका तासातच सर्व श्रेणींमध्ये जवळपास 100 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले. सुरुवातीच्या एका तासातच सर्वाधिक 2.13 पट सब्सक्रिप्शन नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स श्रेणीत मिळाले. या आयपीओच्या मागे सर्वसामान्य गुंतवणूकदारांची गर्दी पण कमी नव्हती. एका तासातच या श्रेणीतील 135 टक्के वाटा विक्री झाला.
एका तासात इतक्या बोली
आयपीओ बाजारात येताच सुरुवातीच्या एका तासात हा आयपीओ 1.60 पट सब्सक्राईब ढझाला. टाटा टेकच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. टाटा समूहावरील विश्वास गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला. ग्रे मार्केटमध्ये म्हणूनच या आयपीओची खासा चर्चा होती.
24 तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी
24 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करु शकतात. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. सर्वसामान्य गुंतवूकदारांसाठी एका लॉटमध्ये 30 शेअर असतील. कोणत्या पण गुंतवणूकदाराला कमीत कमी 15 रुपयांचा डाव टाकावा लागेल. तर गुंतवणूकदार जास्तीत जास्त 390 लॉटमध्ये गुंतवणूक करु शकेल. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये प्रमोटर्सची एकूण 66.79 टक्के वाटा आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 55.39 टक्क्यांपर्यंत घसरेल. कंपनी 6.09 कोटी शेअर आणणार आहे.
ऑफर-फॉर सेल
टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर सेल (OFS) असेल. याअंतर्गत कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि सध्याचे प्रमोटर्स 4.63 कोटी शेअर्सची विक्री होणार आहे. माहितीनुसार, टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.