Tata Technology IPO : प्रतिक्षा संपली, या दिवशी येईल टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ

| Updated on: Sep 03, 2023 | 7:26 PM

Tata Technology IPO : टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बाजारात येण्याची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. 19 वर्षांनी टाटा आयपीओ बाजारात उतरत आहे. सध्या वातावरण तापले आहे. टाटा समूहाच्या या आयपीओसाठी अनेक जण तयार आहेत. याविषयी हे अपडेट समोर आले आहेत.

Tata Technology IPO : प्रतिक्षा संपली, या दिवशी येईल टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ
Follow us on

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या एका कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. हा आयपीओ लवकरच बाजारात येत आहे. टाटा समूहातील आयपीओ जवळपास 19 वर्षांनी बाजारात येणार आहे. या आयपीओचा सर्वच जण प्रतिक्षा करत आहे. हा आयपीओ टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies IPO) आयपीओ बाजारात येत आहे. मार्च महिन्यात आयपीओ घेऊन येण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार बाजार नियामक सेबीने (SEBI) या आयपीओसाठी एक महिन्यापूर्वीच मंजूरी दिली आहे. यापूर्वी टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ  जुलै, 2004 मध्ये आला होता. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ येणार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.

GMP म्हणजे काय

ड्राफ्ट पेपरनुसार कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून जवळपास 9.57 कोटी शेअर विक्री करणार आहे. यामध्ये 8.11 कोटी शेअर टाटा मोटर्स त्यांच्या हिश्शातील विक्री करणार आहे. अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1 मधील 48.6 लाख शेअर विक्री करणार आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार, सध्या हा आयपीओ शंभर रुपयांच्या जीएमपीवर व्यापार करत आहे. या आयपीओचा प्राईस ब्रँड 280 ते 320 रुपयांदरम्यान असू शकते.

हे सुद्धा वाचा

कधी येईल आयपीओ

टाटा टेक्नॉलॉजीजचा आईपीओ पुढील 3 महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. काही वृत्तानुसार, आयपीओ किती मोठा असेल, तसेच इतर अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मार्च महिन्यात कंपनीने दाखल केलेल्या प्रस्तावाला सेबीने मंजुरी दिली आहे.

कंपनी होईल सूचीबद्ध

2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आता टाटा टेक्नॉलॉजी शेअर बाजारात एंट्री करणार आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. आता गुंतवणूकदारांना लवकरच कमाईचा मोका मिळणार आहे.

कर्ज मुक्त होईल कंपनी

टाटा मोटर्स जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केलेला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते.

सूचना : ही केवळ आयपीओची माहिती आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.