केवळ आता थोडी प्रतिक्षा, Tata च्या IPO मध्ये गुंतविता येईल पैसा, जाणून घ्या काय आहे प्राईस बँड

Tata Technologies | टाटा समूहतील कंपनी टाटा टेकचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी आज 22 नोव्हेंबर रोजी बाजारात दाखल होत आहे. गुंतवणूकदार 24 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करु शकतात. गुंतवणूकदारांसाठी कंपनीने 30 शेअर्सचा एक लॉट अशी तजवीज केली आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल.

केवळ आता थोडी प्रतिक्षा, Tata च्या IPO मध्ये गुंतविता येईल पैसा, जाणून घ्या काय आहे प्राईस बँड
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 10:47 AM

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ आज उघडणार आहे. या आयपीओचा गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदार वाट पाहत होते. एका दशकानंतर गुंतवणूकदारांना टाटा समूहातील एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी मिळाली आहे. गुंतवणूकदार 24 नोव्हेंबरपर्यंत या इश्यूमध्ये सब्सक्राईब्ड करु शकतात. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध होईल. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने हवा केली. जीएमपी 350 रुपयांचा आकडा ओलांडून पुढे धावल्याने गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी ठरु शकते.

20 वर्षांपूर्वी आला होता आयपीओ

2004 मध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) आयपीओ बाजारात दाखल झाला होता. आता टाटा टेक्नॉलॉजी शेअर बाजारात दाखल होत आहे. टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही एक इंजिनिअरिंग आणि डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. गुंतवणूकदारांना यामधून मोठी कमाईची संधी मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

अंदाज तरी काय

ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ 351-354 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. जर अशीच परिस्थिती असेल तर हा आयपीओ शेअर बाजारात 850 रुपयांहून अधिकवर सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांहून अधिकचा फायदा होऊ शकतो. कंपनी 5 डिसेंबर 2023 रोजी सूचीबद्ध, लिस्टिंग होईल.

24 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक

24 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करु शकतात. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड 475 रुपये ते 500 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. सर्वसामान्य गुंतवूकदारांसाठी एका लॉटमध्ये 30 शेअर असतील. कोणत्या पण गुंतवणूकदाराला कमीत कमी 15 रुपयांचा डाव टाकावा लागेल. तर गुंतवणूकदार जास्तीत जास्त 390 लॉटमध्ये गुंतवणूक करु शकेल. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये प्रमोटर्सची एकूण 66.79 टक्के वाटा आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 55.39 टक्क्यांपर्यंत घसरेल. कंपनी 6.09 कोटी शेअर आणणार आहे.

इतके शेअर बाजारात

टाटा टेक्नॉलॉजीजचा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर सेल (OFS) असेल. याअंतर्गत कंपनीचे शेअरहोल्डर्स आणि सध्याचे प्रमोटर्स 4.63 कोटी शेअर्सची विक्री होणार आहे. माहितीनुसार, टाटा मोटर्सची टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्के वाटा आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्सची 7.2 टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडचा 3.63 टक्के वाटा आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स 8.11 कोटी, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.2 लाख आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.6 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.