Tata Group : वंदे भारत ट्रेनची कमान टाटा कंपनीकडे! समूहाला रेल्वेचा मोठा ठेका, गुंतवणूकदारांना असा होईल फायदा
Tata Group : वंदे भारत ट्रेन आता वेगवान भारताची ओळख ठरत आहे. त्यातच केंद्र सरकारने येत्या वर्षभरात अजून वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांच्या बांधणीचे काम टाटा समूहाला दिले आहेत. एका वर्षात इतक्या वंदे भारत टाटांच्या कारखान्यातून बाहेर पडतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना असा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली : आधुनिक भारताची वेगवान ओळख म्हणून वंदे भारत ट्रेनकडे (Vande Bharat Train) पाहण्यात येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. देशात वेगवान आणि सुरक्षित दळणवळणासाठी केंद्र सरकार सर्वच स्तरावर प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्ते जोडणीचे प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. उभा-आडवा भारत वेगाने जवळ येत आहे. आता वंदे भारत ट्रेन प्रकल्प लवकरच विस्तारणार आहे. देशात पुढील वर्षी अजून वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. त्यासाठी जागतिक ब्रँड असलेल्या टाटा समूहाला या विशेष ट्रेन तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्या बांधणीचे काम टाटा समूहाला (Tata Group) दिले आहेत. एका वर्षात इतक्या वंदे भारत टाटांच्या कारखान्यातून बाहेर पडतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना असा फायदा होणार आहे.
एका वर्षात टाटाच्या कारखान्यातून नव्या कोऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाहेर पडून देशाच्या सेवेत धावतील. ट्रेन तयार करण्याच्या कार्याला गती देण्यासाठी भारतीय रेल्वे आणि टाटा स्टील यांच्या दरम्यान करार करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये फर्स्ट क्लास एसीपासून ते थ्री टायर कोचपर्यंतची सर्व आसान व्यवस्था टाटा समूहाची आहेत. रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा एलएचबी कोच तयार करण्याचा ठेका पण टाटालाच दिला आहे. याअंतर्गत पॅनल, खिडकी आणि रेल्वेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात येत आहे.
या योजनेतंर्गत भारतीय रेल्वेने 145 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. हा सर्व ठेका टाटा समूहाला देण्यात आला आहे. टाटा स्टील येत्या 12 महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार करणार आहे. टाटा स्टील 22 ट्रेनची निर्मिती करणार आहे. ही मोठी वर्क ऑर्डर आहे. या संपूर्ण रेल्वेची आसान व्यवस्था आणि पॅनल, खिडकी आणि रेल्वेचा संपूर्ण आराखडा टाटा तयार करेल. कार्यादेश मिळताच टाटा स्टीलने याविषयीची निर्मिती प्रक्रिया सुरु केली आहे. या ट्रेनमध्ये 16 कोच असतील आणि 22 ट्रेनची आसान व्यवस्था टाटा तयार करणार आहे.
पुढील वर्षी ही वेगवान ट्रेन ट्रॅकवर देशभरात धावतील. या ट्रेनमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. 22 रेल्वेंची निर्मिती टाटा स्टील करेल. भारतीय रेल्वे आणि टाटा यांनी याविषयीच्या एका करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. येत्या दोन वर्षात रेल्वेने 200 नवीन रेल्वे सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एका वृत्तानुसार, रेल्वे पुढील वर्षात, 2024 च्या पहिल्या तिमाहीतच वंदे भारत ट्रेनमध्ये पहिली स्लीपर कोच तयार करणार आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेसची आसान व्यवस्था विशेष असेल. हे सीट 180 डिग्रीपर्यंत फिरेल. त्यामुळे प्रवाशांना विमानातील आसन व्यवस्थेसारखी सुविधा मिळेल. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष (टेक्नॉलॉजी आणि न्यू मटेरियल्स बिझिनेस) देबाशीष भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. अशा प्रकारची आसन व्यवस्था असणारी ही पहिली रेल्वे ठरणार आहे. टाटा स्टील सातत्याने रेल्वे खात्यात त्यांचा हिस्सा वाढवत आहे. आता टाटा समूहाच्या शेअरमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल.