मुदत ठेवीलाही टाकले मागे,टॅक्सची ही झंझट नाही; गुंतवणुकीचा हा पर्याय माहिती आहे ना?

गुंतवणुकदारांना गुंतवणुकीचे अनेक प्रकार आकर्षित करतात. अनेक पर्याय असल्याने ग्राहक त्याच्या सोयीनुसार त्यात रक्कम गुंतवितो. सरकारला ज्यावेळी बाजारातून पैसा उभा करायचा असतो. तेव्हा सरकार बाजारात बाँड आणते. कर आकारल्या जात नसल्याने सरकारी बाँडला टॅक्स फ्री बाँड ही म्हणतात.

मुदत ठेवीलाही टाकले मागे,टॅक्सची ही झंझट नाही; गुंतवणुकीचा हा पर्याय माहिती आहे ना?
मुदत ठेवीवर करमुक्त बाँडचा उताराImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 6:17 PM

महागाईने (Inflation) बेहाल झालेल्या नागरिकांना गुंतवणुकीचा कोणता पर्याय तारु शकतो, हा प्रश्न नवख्या गुंतवणुकदाराला हमखास पडतो. फसवणूक ही नको, नुकसानही नको आणि रक्कम ही सुरक्षित रहावी असे धोरण असलेल्या गुंतवणुकदाराला गुंतवणुकीची एक चांगली संधी आहे. बँकेतील बचत खाते, मुदत ठेवीपेक्षा ही या पर्यायामध्ये ग्राहकाला चांगला परतावा मिळतो. मुदत ठेवीत रक्कम गुंतवणुकीकडे अनेकांचा ओढा असतो. सध्या मुदत ठेवीवरील(FD) व्याजदरात ब-यापैकी वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेकांना मुदत ठेवीत गुंतवणूक करणे योग्य वाटत आहे. आर्थिक सल्लागारांचा(Finance Expert) सल्ला मानला तर गुंतवणूक ही नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे या परंपरागत गुंतवणूक पर्यायाव्यतिरिक्त टॅक्स फ्री बाँड (Tax Free Bond) हा परताव्याच्या दृष्टिकोनातून चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक कर सवलतीसह मिळते.

सरकारी बाँड वा टॅक्स फ्री बाँड सरकारी संस्था अथवा कंपन्या बाजारात दाखल करतात. बाजारातून पैशांची उभारणी करणे हा त्याचा उद्देश आहे. अर्थसंकल्पात सरकार, बाजारातून किती रक्कम उभी करायची याचे उद्दिष्ट निर्धारीत करते. अशावेळी सरकार बाँडची मदत घेते. उदाहरणादाखल तुम्ही महानगरपालिकेचा बाँड घेऊ शकता. या बाँड खरेदीवर तुम्हाला एक निश्चित व्याज देण्यात येते. तसेच हा बाँड डबघाईला येण्याचा वा डुबण्याचा कोणताही धोका नसतो. या बाँडचे सर्वात वेगळे आणि महत्वाचे वैशिष्टये म्हणजे याचे कर मुक्त धोरण. प्राप्तीकर कायदा (Income Tax Act) 1961 चा नियम 10 नुसार सरकारी बाँडवरील व्याजावर कुठला ही कर आकारण्यात येत नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे टॅक्स फ्री बाँड

टॅक्स फ्री बाँडची मर्यादा दहा वर्षांची असते. याला दीर्घकालीन गुंतवणुकीच्या (Long term investment) श्रेणीत सुचीबद्ध करण्यात येते. गुंतवणुकदार या बाँडमध्ये अधिकची रक्कम गुंतवतात. यामधून जमा झालेला पैसा सरकार विकास कामांसाठी खर्च करते. ही रक्कम सरकार गृहप्रकल्प आणि इतर प्रकल्पात गुंतविते. ज्येष्ठ नागरिकांसाठी या प्रकारची गुंतवणूक फायदेशी मानण्यात येते. एकतर याला सरकारच्या सुरक्षेची हमी मिळते आणि यामाध्यमातून एक निश्चित परतावा ही मिळतो. जे व्यापारी, व्यावसायिक हजारोंचा कर भरणा करतात, तेही या योजनेत रक्कम गुंतवितात. या प्रकारच्या बाँडमध्ये कोणत्याही प्रकारचा टीडीएस कपात होत नाही.

टॅक्स फ्री बाँडचे फायदे काय

टॅक्स फ्री बाँडचा परतावा त्यातील गुंतवणुकीवर अवलंबून आहे. हा बाँड अधिक कमाई करणा-या लोकांना देण्यात येतो. याची संख्या कमी ठेवण्यात येते. एका ठराविक संख्येतच या बाँडची खरेदी करत येते. या बाँडवर व्याज दर (interest rate) हा सामान्यतः 5.50 ते 6.50 टक्क्यांच्या दरम्यान असते. त्यामुळे बचत खाते आणि मुदत ठेव यांच्यापेक्षा यातील गुंतवणूक चांगली मानण्यात येते. बाँडचा परतावा महागाईला थोपविण्यास मदत करते.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.