नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देतात. कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात. दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. (Tax Rules To Selling And buying Gold)
जर आपण सोने खरेदीच्या 36 महिन्यांअगोदर सोने विक्रीला काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो आणि खरेदीच्या 36 महिन्यांनंतर सोने विक्री करताना लॉन्ग टर्म कॅपिटल्स गेन टॅक्स लागतो.
दोन्ही रितीने कॅपिटल्स गेन टॅक्सचं कॅलक्युलेशन वेगवेगळ्या प्रकारे असते. जर खरेदीच्या 36 महिन्यांच्याअगोदर सोने विक्रीला काढले तर कॅपिटल्स गेन टॅक्स आपल्या मूळ किमतीवर जोडला जातो. आपण ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्याच्यानुसार आपल्याला टॅक्स चुकवावा लागतो. जर तुम्ही खरेदीच्या 36 महिन्यांच्या नंतर विक्री करत असाल तर त्यावर 20 टक्के टॅक्स लागतो. त्यावर सरचार्ज आणि एज्युकेशन सेस देखील लागतो. पाठीमागच्या सादर झालेल्या बजेटमध्ये LTCG वर सेस 3 टक्क्यांवरुन 4 टक्के इतका वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे ज्यामुळे आता LTCG वर 20.80 टक्के इतका टॅक्स लागतो.
जर कॅपिटल गेनऐवजी कॅपिटल लॉस झाला म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या किमतीला आपण सोने खरेदी केले तेवढ्याच किमतीला आपल्या सोन्याची विक्री झाली तर टॅक्समध्येही आपल्याला सूट मिळते. भारतीय संस्कृतीत सोने शुभ मानले जाते. अनेक जण आपल्या प्रियजणांना सोने गिफ्ट स्वरुपातही देतात. एका आर्थिक वर्षात गिफ्टच्या रुपात 50 हजार रुपयांपर्यंतच्या गोल्ड गिफ्टवर टॅक्स लागत नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात (Gold international rate) किरकोळ वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1900 डॉलरवर पोहचले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फेब्रुवारीत डिलिव्हर होणारं सोनं 0.10 डॉलरच्या वाढीसह 1901.60 डॉलर प्रति आऊंसवर पोहचलं. मार्चमध्ये बाजारात येणाऱ्या चांदीचे दर (Silver international rate) 0.002 डॉलरच्या घटीसह 26.52 डॉलर प्रति आऊंसवर पोहचले आहेत. (Tax Rules To Selling And buying Gold)
संबंधित बातम्या
Gold Outlook 2021 : नववर्षात सोन्याची किंमत वधारणार, प्रतितोळा 63 हजारांचा टप्पा गाठणार!
Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव…