Tax savings : नोकरदार अनेक मार्गांनी वाचवू शकतात कर; जाणून घ्या कर वाचवण्याचे सोपे मार्ग

नोकरदारांकडे (employee) कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पगारी व्यक्तीला (salaried person) पगारासहीत अनेक भत्ते (allowances) दिले जातात. नियोक्त्याकडून मिळणाऱ्या काही भत्यांवर कर सवलतीचा दावा करण्यात येतो.

Tax savings : नोकरदार अनेक मार्गांनी वाचवू शकतात कर; जाणून घ्या कर वाचवण्याचे सोपे मार्ग
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 11:21 AM

नवी दिल्ली : नोकरदारांकडे (employee) कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पगारी व्यक्तीला (salaried person) पगारासहीत अनेक भत्ते (allowances) दिले जातात. नियोक्त्याकडून मिळणाऱ्या काही भत्यांवर कर सवलतीचा दावा करण्यात येतो. मात्र, त्यासाठी काही अटी आहेत. आज आपण हे भत्ते आणि त्यांच्या अटीबद्दल जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला कर सवलतीचा फायदा घेणं सोपं होऊ शकतं.कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता, कार्यालयीन कामासाठी येण्या-जाण्याचा खर्च म्हणजेच टूर ड्युटी अलाउंस, युनिफॉर्म अलाउंस, बुक, पीरियॉडिकल अलाउंस आणि मोबाइल रीइंबर्समेंट सारखे अनेक लाभ मिळतात. या भत्त्यांवर आयकर सवलत मिळते. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात. पुरावे सादर न केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रकमेवर कर द्यावा लागतो.

अनेक भत्ते करमुक्त

आयकर नियमांअंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात येत असलेले बहुतांश भत्ते करमुक्त असतात. मात्र, तो खर्च वास्तवात केलेला असावा. त्यावर आयकर अधिनियम, 1961 कलम 10(14) (i) अंतर्गत सवलत मिळते. कार्यालयीन भत्त्यांवर कर सवलत मिळवण्यासाठी दोन बाबींवर लक्ष ठेवले पाहिजे. पहिली म्हणजे कर सवलत मिळवण्यासाठी पुरावे म्हणून बिल आणि व्हाऊचर असायला हवेत. तुम्हाला हे बिल ऑफिसमध्ये सादर करावे लागतात. दुसरा म्हणजे हा खर्च कार्यालयीन कामकाजासाठी केलेला असायला हवा. कोणत्याही वैयक्तिक वापरासाठी वापर केलेला नसावा.ITR भरताना कर सवलतीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सध्याच्या ITR मध्ये करदात्यांना नियोक्त्याकडून मिळणारे विविध भत्ते आणि सवलतीविषयी माहिती मागवण्यात येते. नियोक्त्याकडून मिळणाऱ्या भत्यांवर कर सवलत मिळत असेल तर ITR फॉर्ममध्ये करमुक्त उत्पन्न असे दर्शवावे. कर्मचाऱ्याला मिळालेली वास्तवीक कर सवलतीच्या रक्कमेची माहिती फॉर्म -16 च्या पार्ट – बी मध्ये मिळते.

हे सुद्धा वाचा

कर सवलतीसाठी पुरावे महत्त्वाचे

मोबाईल बिल, लोकल कन्वेंस यासारखा भत्त्यांवर कर सवलत मिळते. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात. ही एक प्रकारे परतफेड आहे. लीव्ह ट्रॅव्हल अलाउंसवरसुद्धा करात सूट मिळते. चार वर्षातून दोनदा LTA क्लेम करता येतो. दुसरीकडे कंपनीकडून सीटीसीमध्ये मिळत असलेल्या विशेष भत्त्यांवर मात्र कर द्यावा लागतो. अशी माहिती कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन यांनी दिलीये.एखाद्या कर्मचाऱ्याला मिळणारे भत्ते कराच्या कक्षेत येत असल्यास त्यावर TDS द्यावा लागतो. भत्यांवर लागणारा TDS कोणती कर व्यवस्था निवडली आहे यावर अवलंबून असतो. जुन्या कर व्यवस्थेत राहून सवलत आणि कपातीचा लाभासाठी दावा करता येतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.