नवीन कर प्रणालीला सर्वाधिक लाईक; इतक्या करदात्यांचा जुन्या कर प्रणालीला रामराम, तुम्ही ITR भरला का, काय आहे शेवटची तारीख?

Old Tax Regime Vs New Tax Regime : नवीन कर प्रणालीवर करदात्यांच्या उड्या पडल्या आहेत. तर जुन्या कर प्रणालीला बऱ्याच करदात्यांनी रामराम केल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. या बजेटमध्ये केंद्र सरकारने जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल केला नाही, हे विशेष.

नवीन कर प्रणालीला सर्वाधिक लाईक; इतक्या करदात्यांचा जुन्या कर प्रणालीला रामराम, तुम्ही ITR भरला का, काय आहे शेवटची तारीख?
नवीन कर प्रणाली, जुनी कर प्रणाली
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 10:38 AM

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, करदाते आता मोठ्या प्रमाणावर नवीन कर प्रणालीकडे वळाले आहेत. त्यातील अनेकांनी जुन्या कर प्रणालीला रामराम ठोकला आहे. चालू सत्रामध्ये जे आयकर रिटर्न (ITR) दाखल झाले आहेत. त्यातील 66 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडली आहे. आतापर्यंत एकूण 4 कोटींहून अधिक रिटर्न दाखल करण्यात आले आहे. पीटीआयने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, प्रत्यक्ष कर विभाग आणि केंद्र सरकार आयकर व्यवस्था अजून सुटसुटीत आणि सोपी करण्यावर भर देत असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. विना दंड आयकर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. आता कर भरण्यासाठी सात दिवसांचा कालावधी उरला आहे.

गेल्या वर्षांपेक्षा अधिक रिटर्न फाईल

आयकर भरण्यासाठी जितकी सोपी आणि सहज पद्धत असेल तितके लोकांना कर भरणा करणे सोपे जाईल, हा सरकारचा विचार आहे. सरकारने त्यासाठी पाऊलं टाकली आहे. त्याचाच परिणाम यंदा दिसला आहे. आतापर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 25 जुलैपर्यंत 4 कोटींचा आकडा ओलांडला होता. तर यंदा 22 जुलै रोजीच हा टप्पा ओलांडला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत हा आकडा अजून वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन कर प्रणालीवर उड्या का?

CBDT चे अध्यक्ष रवी अग्रवाल यांच्या मते नवीन कर प्रणाली ही आकर्षक वाटत असल्याने या प्रणालीकडे करदाते वळत आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या आयटीआरमध्ये जवळपास 66 टक्के आयकर रिटर्न हे नवीन कर प्रणालीद्वारे भरण्यात आला आहे. पुढील काही बजेटमध्ये नवीन आयटीआर व्यवस्थेत अजून मोठा काही बदल होऊ शकतो. ही व्यवस्था अधिक आकर्षक होण्याची आशा करदात्यांना आहे. त्यामुळे नवीन कर प्रणालीकडे करदात्यांचा ओढा वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत जवळपास 7.5 कोटी आरटीआय दाखल करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.