नवी दिल्ली- भारतातील आघाडीची क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) कॉईनडीसीएक्सने CoinDCX क्रिप्टो व्यवहारांवर 1% टीडीए नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. 1 जुलै पासून सर्व क्रिप्टो ट्रान्झॅक्शन वर गुंतवणुकदारांना 1 टक्के TDS अदा करावा लागेल. क्रिप्टो व अन्य आभासी संपत्तीच्या (व्हर्च्युअल डिजिटल असेट) विक्रीवर 1 जुलै 2022 पासून 1% टीडीएस (TDS) लागू करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक टक्के टीडीएसची घोषणा केली होती. केवळ टीडीएसच नव्हे तर क्रिप्टो आणि एनएफटी सहित अन्य डिजिटल व्हर्च्युअल असेटच्या (Digital Virtual Asset) ट्रान्झॅक्शनच्या उत्पन्नावर 30% टॅक्सची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिप्टो वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना त्यापूर्वीच नव्या नियमामुळं ग्राहकांना कर संरचनेला सामोर जावं लागणार आहे.
· सेल आणि लिमिट सेल ऑर्डर वर 1% टीडीएस कपात
· सर्व यूजर्सला कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 1 जुलाई 2022 किंवा त्यापूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल.
· आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करताना 1% टीडीएस रिफंडच्या रुपात क्लेम केला जाऊ शकतो.
· बाय, लिमिट बाय, सीआयपी आणि अन्य ऑर्डरवर कोणताही टीडीएसची आकारणी केली जाणार नाही.
क्रिप्टोकरन्सीच्या जगतात नकारात्मक व्यवहाराचं ढग गडद झाले आहेत. जागतिक अर्थपटलावरील घडामोडींमुळे क्रिप्टोकरन्सीच्या भाव घसरणीला लागले आहे. बिटकॉईन्सच्या भाव 17 टक्क्यांच्या घसरणीसह 22000 डॉलरच्या स्तरावर पोहोचला होता. बिटकॉईनच्या पडझडीमुळे कोट्यावधी गुंतवणुकदारांना अरबो रुपयांवर पाणी फेरावं लागलं आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून बिटकॉईनच्या दरात पडझड सुरु आहे. केवळ बिटकॉईनच नव्हे तर अन्य क्रिप्टोकरन्सीत देखील घसरण नोंदविली गेली. इशिरियम, बिनान्स आणि एक्सआरपीत देखील 12-14 टक्क्यांची घसरण झाली. आतापर्यंतच्या व्यवहाराच्या इतिहासात बिटकॉईन व इथिरियमचे दर सर्वोच्च किंमतीपेक्षा तब्बल 75 टक्क्यांनी घसरले आहेत.
जगभरातील युवा गुंतवणुकदारांनी बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीकडं मोर्चा वळविला होता. कमी कालावधीत अधिक परताव्याच्या लाभामुळं क्रिप्टो अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. महागाईचं वाढतं प्रमाण आणि मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थांचा दर यामुळे क्रिप्टो वर्तृळात गुंतवणुकदारांचा उत्साह दिवसागणिक मावळला. भारतात क्रिप्टो व्यवहारावर कर आकारणीच्या निर्णयामुळं क्रिप्टो मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा ओघ सुरू झाला.