Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dollars Power : आता करन्सी वॉर! डॉलरच्या मक्तेदारीला सुरुंग, भारतासह इतके देश आले मैदानात

Dollars Power : डॉलरची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केवळ रशियाच नाही तर भारतासह चीन आणि अन्य संघटनाही मैदानात उतरल्या आहेत. काय आहे ही करन्सी वॉर

Dollars Power : आता करन्सी वॉर! डॉलरच्या मक्तेदारीला सुरुंग, भारतासह इतके देश आले मैदानात
रुपया आता डॉलरला घेरणार
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली : अमेरिकेत (Superpower America) थोडी जरी उलथापालथ झाली की त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसतो. अमेरिकेत मंदीची लाट आली की जगातील अर्थव्यवस्थांना जोरदार हादरे बसतात. अमेरिकेभोवती फिरणारे हे आर्थिक चक्रचं भेदले तर? जगातील काही देशांनी त्यासाठी चंग बांधला आहे. डॉलरविरोधात (Dollar) आता करन्सी वॉर पुकारण्यात आले आहे. अर्थात त्यासाठी कोणतं ही नवीन आंतरराष्ट्रीय चलन तयार करण्यात येत नाहीये. तर रशिया, भारतासह चीन त्यांच्या चलनाला जागतिक मंचावर बळ मिळवून देत आहे.

जगाचा चौथा जीडीपी ग्रूप डॉलरची बादशाहत समाप्त करण्यासाठी जगातील चौथा जीडीपी हिस्सेदार असलेल्या 5 देशांचा समूह एकवटला आहे. या देशांनी त्यांच्या चलनातच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आग्रह धरला आहे. तसेच एकमेकांच्या चलनाला बळ देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या करन्सी वॉरमध्ये (Currency War) जगावर प्रभाव टाकू शकणाऱ्या रशिया, भारत आणि चीन या अर्थसत्तांसह इतर अनेक देशांचा ‘कारवां’ तयार होत आहे.

ब्रिक्सचा पुढाकार ब्रिक्स संघटनेत भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. करन्सी वॉर सुरु केल्यानंतर या संघटनेत सहभागी होण्यासाठी इतर 19 देशांनी अर्जांचा सपाटा लावला आहे. डॉलरची दहशत संपविण्यासाठी हा संघटना स्थापन करण्यात आली आहे. आता जगातील मोठी व्यापारी उलाढाल असलेल्या अर्थव्यवस्थांनी साथ दिली तर अमेरिकन डॉलरला लोळविणे अवघड नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीय रुपयांची वर्णी या लढाईत भारताने रुपयाला पुढे केले आहे. विविध देशांनी भारताच्या या निर्णयाचे स्वागतच केले नाही तर तातडीने भारतीय रुपयांत पुढील व्यवहारांसाठी भारतीय केंद्रीय बँकेच्या योजनेत सहभाग पण घेतला आहे. रशियाकडून तेल खरेदी करताना भारताने संयुक्त अमिरातशी रुपयांची गाठ बांधली. त्यामुळे रशियाचे रुबल, युएईचं चलन आणि भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात फिरला.

वोस्ट्रो खाते केंद्रीय बँकेने घरगुती आणि परदेशी बँकांना रुपयात व्यापारासाठी 60 खास रुपया वोस्ट्रो खाते (SRVA) उघडण्यास मंजूरी दिली आहे. पीटीआयने विषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 49 देशांनी भारतीय रुपयात व्यवहार करण्यासाठी खाते उघडली आहेत. तर इतर अनेक देशांना परवानगीची प्रतिक्षा आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. या खात्यांचा उद्देश रुपयाच्या माध्यमातून परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

या देशांचा समावेश भारतात एसआरव्हीए खाते उघडणाऱ्या देशांमध्ये जर्मनी, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, रशिया, सिंगापूर, श्रीलंका, बोत्सवाना, फिजी, गुयाना, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, ओमान, सेशेल्से, टंझानिया, युगांडा यांचा समावेश आहे. या यादीत अजून अनेक मोठ्या देशांचा समावेश होणार आहे. हा आकडा लवकरच 70 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.

चीन पण स्पर्धेत रशियाचं रुबल, भारतीय रुपयासोबतच चीन पण या स्पर्धेत अग्रेसर आहे. चीनने वन बेल्ट वन रुट च्या माध्यमातून त्याची जग जिंकण्याची महत्वकांक्षा अगदोरच अधोरेखित केली आहे. आता डिजिटल युआनच्या माध्यमातून चीन अधिक्रमण करत आहे. सध्या चीन जगातील 130 देशांशी व्यापार करत आहे. या उलाढाली केवळ युआन या चलनातच होतात. यावरुन चीनने काळाच्या किती पूर्वी पाऊल टाकलं हे लक्षात येते.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.