मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब

चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियाला आज नवीन मालक मिळाला. एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत आहेत. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे गेलीय.

मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब
air india
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 4:53 PM

नवी दिल्लीः एअर इंडियाबद्दल मोठी बातमी दिल्लीतून येतेय. एअर इंडियाची जबाबदारी आता टाटा सन्सकडे असेल. टाटांनी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. ती सर्वोच्च असल्यामुळे टाटाकडे एअर इंडियाची कमान देण्यात आलीय. 68 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटाकडे एअऱ इंडिया आलीय. गेल्या काही वर्षात महाराजाची अवस्था वाईट होती. आता ती टाटांकडे गेल्यामुळे तिची हालत सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी सर्वात मोठी

मोदी सरकारने जुलै 2017 मध्ये एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून ती विकत घेण्याचा अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर एअर इंडियाला आज नवीन मालक मिळाला. एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली कोणी लावली याबाबत डीआयपीएएम सचिव आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव पत्रकार परिषद घेत माहिती दिलीय. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे गेलीय. 1953 साली भारत सरकारने टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी खरेदी केली होती. अशा स्थितीत एअर इंडियाला टाटा समूहाकडे परत येण्यास एकूण 68 वर्षे लागली. एअर इंडियाची सुरुवातीपासूनची रोचक कथा जाणून घेऊया.

1932 मध्ये एअर इंडियाची स्थापना

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल 1932 मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.

…म्हणून टाटा एअरलाईन्सचे नाव बदलले

एअरलाईनने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. वर्ष 1938 मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. 1938 मध्ये कोलंबो आणि दिल्ली त्याच्या गंतव्यस्थानांमध्ये जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

सरकारने 1953 मध्ये मालकी घेतली

1953 मध्ये भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली. जेआरडी टाटा 1977 पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले. कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले.

1962 मध्ये एअर इंडियाचे नाव बदलले

21 फेब्रुवारी 1960 रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. विमान कंपनीने 14 मे 1960 रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरू केली. 8 जून 1962 रोजी एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. आणि 11 जून 1962 रोजी एअर इंडिया जगातील पहिली जेट विमान कंपनी बनली. 2000 मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. 23 मे 2001 रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स 2007 मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली.

2017 मध्ये खासगीकरणासाठी सरकारची मान्यता

यानंतर 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिली. वर्ष 2018 मध्ये एअर इंडियाला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो अयशस्वी ठरला. त्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली. एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडिया अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) ला 22,064 कोटी रुपये हस्तांतरित केल्यानंतर एवढी रक्कम उरते. जर एअर इंडियाला विकलं नसतं तर सरकारकडे तिला बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता.

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! गाड्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी बनवले नवे कवच, जाणून घ्या

1 वर्षात मालमत्तेच्या किमतीत 25% पर्यंत वाढ, घर खरेदी करणे महागणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.