Sudha Murthy | रिस्क है तो इश्क है! प्रेमासाठी सुधा मुर्ती यांनी पत्करली होती ही मोठी जोखीम
Sudha Murthy | सुधा मूर्ती यांची राज्यसभेसाठी निवड झाली आहे. एक त्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात इन्फोसिस आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल्या जोखीमेची कथा सांगितली. यामुळे त्यांची बचत अवघी 250 रुपये उरल्याची आठवण त्यांनी सांगितली. काय होती ही जोखीम...
नवी दिल्ली | 16 March 2024 : मनात विश्वास असला आणि काही करण्याचा पक्का निर्धार असला की मोठ्यातील मोठी जोखीम पण माणूस लिलया पेलतो. पण जोखीम तेव्हा अधिक वाढते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवता. त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेऊन मोठा निर्णय घेता. ही जोखीम तेव्हा अधिक असते, जेव्ही ती व्यक्ती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलेली असते. तरीही तो यशस्वी होईल असा विश्वास तुम्हाला वाटत असतो. सुधा मूर्ती यांनी पण अशीच एक रिस्क घेतली. त्यांनी पती नारायण मूर्तीसाठी हा डाव खेळला. दोघांना पण चांगला पगार होता. नारायण मूर्ती यांना स्वतःचा उद्योग सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांनी त्यावेळी जपून ठेवलेले 10 हजार रुपये दिले. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 250 रुपये उरले होते. काय आहे हा किस्सा?
पत्र्याच्य डब्यातील रक्कम दिली
इन्फोसिसची (Infosys Company) स्थापना 1981 मध्ये सात मित्रांनी मिळून केली होती. आज या कंपनीने इतिहास रचला. सुधा मूर्ती यांनी पत्र्याच्या डब्ब्यात 10 हजार रुपये जमा केले होते. हीच त्यांची पिग्मी बँक होती. ज्यातून इन्फोसिसची सुरुवात झाली. सुधा मूर्ती यांनी पत्र्याच्या डब्ब्यात पैसा साचविला. याच रक्कमेतून इन्फोसिस सुरु झाली.
नोकरीला रामराम
एन. आर. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा या सात मित्रांनी मिळून या कंपनीची सुरुवात केली. पाटणी कंम्प्युटर सिस्टमला राम राम ठोकल्यानंतर त्यांनी आयटी सेवा पुरवठादार म्हणून कामाला सुरुवात केली.
सुधा मूर्ती यांच्याकडे उरले 250 रुपये
सुधा मूर्ती यांच्याकडे 10,250 रुपये जमा होते. नारायम मूर्ती यांना कंपनी उभारणीसाठी भांडवल हवे होते. त्यांचा या पूर्वीचा प्रयत्न हुकला होता. त्यावेळी सुधा मूर्ती यांच्याकडे असलेल्या रक्कमेतून 10 हजार रुपये देण्यात आले. त्यातून इन्फोसिसची पायाभरणी झाली. त्यावेळी मूर्ती यांच्याकडे अवघे 250 रुपये उरले होते. मार्च 2024 मध्ये इन्फोसिसचे मार्केट कॅप 81.52 डॉलर अब्जपर्यंत आहे.