चव म्हटलं की चितळे! भिलवडीतून सुरू केलेला व्यवसाय जगभर पोहोचवला, कोण आहेत भास्कर चितळे?

उद्योग जगतात एक दिग्गज पाऊल उचललेले चितळे बंधू प्रसिद्ध आहेत. दिवसाला तीन टन बाकरवडी आणि विविध उत्पादनांसाठी रोज चार लाख लिटर्स दूध संकलन करणारे चितळे बंधूंनी खूपच कष्ट उपसले आणि भलंमोठं साम्राज्य उभं केलं.

चव म्हटलं की चितळे! भिलवडीतून सुरू केलेला व्यवसाय जगभर पोहोचवला, कोण आहेत भास्कर चितळे?
Bhaskar Chitale jankibai chitale
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:36 AM

सांगली/पुणेः कुरकुरीत बाकरवडी आणि स्वादिष्ट मिठाईसाठी चितळे बंधू प्रसिद्ध आहेत. चितळे बंधूंच्या मिठाईची चव कायमच पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळत असते. विशेष म्हणजे चितळेंची मिठाई ही पुण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राभर मिळते. त्यामुळे चितळेंची मिठाई अनेकांना माहीत आहे. पण चितळे बंधूंच्या मिठाईचं एवढं मोठं साम्राज्य भास्कर गणेश चितळे ऊर्फ बाबासाहेब चितळेंनी उभं केलंय. भास्कर चितळेंबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

एकत्र कुटुंब पद्धतीतच ‘चितळे बंधू’ यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य

उद्योग जगतात एक दिग्गज पाऊल उचललेले चितळे बंधू प्रसिद्ध आहेत. दिवसाला तीन टन बाकरवडी आणि विविध उत्पादनांसाठी रोज चार लाख लिटर्स दूध संकलन करणारे चितळे बंधूंनी खूपच कष्ट उपसले आणि भलंमोठं साम्राज्य उभं केलं. म्हशींना खाद्य देण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा जगातला पहिला सुसज्ज गोठा हा चितळे बंधूंच होता. भिलवडीतलं म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र, ऑनलाईन ऑर्डर दिल्यास जगाच्या कानाकोपऱ्यात खाद्यपदार्थ पोहोचवणारं व्यवस्थापन, असा अवाढव्य चितळे बंधूंचा उद्योग पसरलेला होता. गेल्या चार पिढ्यांपासून एकत्र कुटुंब पद्धतीतच ‘चितळे बंधू’ यांच्या व्यावसायिक यशाचं रहस्य दडलंय.

अन् जानकीबाई चितळे यांनी लावलेल्या रोपट्याचा झाला वटवृक्ष

भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात चितळेंचं नाव आहे. 1936 च्या सुमारास कृष्णेकाठी भिलवडी गावात सुरू केलेल्या दुधाच्या धंद्याचं रूपांतर आता उद्योगसमूहात झालंय. 150 लिटर्स दुधाचा धंदा रोज 4 लाख लिटर्स दूध संकलनावर पोहोचला. भिलवडी परिसराचा चितळ्यांमुळेच चेहरामोहरा बदलला. चितळे दाम्पत्यांनी रात्रंदिवस कष्ट काढले, रात्र जागवून बासुंदी आटवली. गुजराती व्यापाऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी चांगल्या प्रकारचा चक्काही बनवला. ‘व्यवसायात यशस्वी व्हायचं असल्यास डिलिव्हरीची व्यवस्थाही आपलीच हवी’ हा आग्रहही त्यांना खूपच फायद्याचा ठरला.

‘कष्ट, सातत्य आणि सचोटी’ हे चितळेंचे मूलमंत्र

भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांचे थोरले सुपुत्र रघुनाथराव यांनीसुद्धा वडिलांचा व्यवसाय मोठ्या कष्टानं वाढवला. ‘कष्ट, सातत्य आणि सचोटी’ हे वडिलांनी सांगितलेले तीन शब्द त्यांनी कायम स्मरणात ठेवले. पहिल्यांदा ‘चितळे डेअरी’ स्थापन केली, त्यानंतर मग ‘शिवसंतोष दुग्धालय’ नंतर 1950 मध्ये डेक्कन जिमखान्यावर मिठाईचं दुकान आणि नंतर बाजीराव रोडवर दुकान आणि विस्तार वाढतच गेला. पुण्यात रघुनाथराव चितळे आणि राजाभाऊ चितळे तर भिलवडीला दत्तात्रेय चितळे आणि परशुरामभाऊ चितळेंनी जोमानं काम करत होते. चितळे कुटुंबानं एकत्रित स्वतःचा मोठा व्यवसाय उभारला. भास्कररावांच्या दूरदृष्टीने एका मुलाने म्हणजे मुकुंदभाऊंनी पूर्ण ट्रान्सपोर्ट विभाग सांभाळला होता. शिवाय मुकुंद चितळ्यांनी भिलवडीतील ‘चितळे डेअरी’ च्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम केले. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ, सिंहगड शिक्षण संकुल उभारून बांधकाम व्यवसायातही चितळ्यांच्या नावांचा लौकिक वाढवला.

चितळे कुटुंबात तिसरी आणि चौथी पिढीसुद्धा व्यवसायात

चितळे कुटुंबात तिसरी आणि चौथी पिढीसुद्धा व्यवसायातच उतरलीय. भिलवडीला तिसरी पिढी म्हणजे विश्वास परशुराम चितळे इंजिनीयर झाले, तेव्हा मित्रमंडळी अमेरिकेत येण्याचा आग्रह करत होती. तेव्हा वडिलांनी गोडीनं सांगितलं, ”मी तुला डॉलर्समध्ये तेवढाच पगार देतो. वर्षभर काम कर, नाहीतर खुशाल जा.” विश्वास यांनी ते ऐकलं आणि भिलवडीतच संशोधन विकासात इतके रमले की आज ते उद्योगक्षेत्रातल्या ‘डेल पुरस्काराचे मानकरी’ ठरलेत.

म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र भिलवडीतच

चितळ्यांकडे संस्थापक भास्कर गणेश यांनीच नेहमी काळाच्या पुढे पाऊल टाकलं. त्या काळात सुसज्ज पाश्चरायझेशनची सुरुवात त्यांनी केली. वैयक्तिक पातळीवर पिशव्यांतून दूध देण्याचा प्रारंभ केला. चक्का-खवा यासाठी मशिनरी आली. भारतात पहिल्यांदा 1988-89 मध्ये चितळ्यांच्या दुकानात आरएफआय बिलिंग सिस्टीम आली. म्हशींना खाणं देण्यापासून दूध काढण्यापर्यंत संपूर्णपणे संगणकावर चालणारा सुसज्ज गोठा जगात पहिल्यांदा चितळ्यांनी भिलवडीत उभारला आणि आता म्हशींच्या जेनेटिक्सचा अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र भिलवडीतच आहे, ज्याचा फायदा परिसरातले शेतकरी घेतच आहेत. पण कोणताही शेतकरी त्यांच्याकडून अशा तऱ्हेचं मार्गदर्शन घेऊ शकेल.

राजाभाऊ चितळ्यांनी नागपूरमधील पुडाची वडी पुण्यात आणली

दुसरीकडे पुण्यात 70-71च्या सुमाराला राजाभाऊ चितळ्यांनी नागपूरमधील पुडाची वडी आणली. गुजराती बाकरवडीला मागे सारत खास मराठी चवीची बाकरवडी आणली आणि या बाकरवडीनं चितळ्यांना जगभर पोहोचवलं. दुकानासमोर रांगा लागायच्या. 50 माणसं कामाला ठेवली तरी दिवसाला 500 किलोपेक्षा जास्त बाकरवडी बनत नव्हती. चितळे बंधूंनी परदेशात जाऊन सतत प्रयोग करून आपल्याला हवं तसं बाकरवडीचं मशीन बनवून घेतली. आता दिवसाला 3 टन बाकरवडी बनवता येते आणि कंटेनर्स भरभरून परदेशातही पाठवली जाते. एकदा सह्याद्री वाहिनीनं चितळ्यांवर एक लघुपट केला. ”एकाच व्यवसायात कायम टिकायचं असेल तर घरं वेगवेगळी ठेवा” हाही मूलमंत्र बी. जी. चितळे यांचाच होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच ज्याला हवा त्याला स्वतंत्र संसार थाटता आला. आता तर डेअरी, मिठाई, अॅग्रो, फूडस् आणि चितळे डिजिटल्स सारे स्वतंत्र उद्योग आहेत. मिठाईवाले जसे इतरांकडून कच्चा माल घेतात, तसाच भिलवडीहून खवा घेतात.

चितळ्यांनी अनेक हातांना रोजगार दिले

भिलवडी परिसरातल्या शेतकऱ्यांना हजारो म्हशी देऊन देखभाल करून, दूध विकत घेणारे चितळे तेथील शेतकरी स्त्रियांसाठी अनेक आरोग्य प्रकल्प राबवतात. त्यांना आधुनिक माहिती पुरवतात. एक हजार जोडप्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी विविध कामांमध्ये गुंतवलंय. शास्त्रीय पद्धतीनं जेनेटिक्सद्वारा गुणवृद्धी करून येत्या काही वर्षांत दहा लाख उत्तम वासरं जन्माला घालण्याचे प्रयोग चालू आहेत. त्यातून दुधाचं उत्पादन प्रचंड वाढेल. शेतीतही नवनवे प्रयोग चालू आहेत. रेडिमिक्सची सकस पाकिटं ते बनवताहेत. दुधापासून दुधाच्या महापुरापर्यंत आणि सकस शुद्ध चवीपासून गृहलक्ष्मीच्या आरोग्यापर्यंत चितळे कुटुंबीयांचं काम पोहोचत आहे.

जानकीबाईंचा वसा चितळे कुटुंबातील महिलांनीही नेला पुढे

चितळेंचा पैशाचा हिशेब चोख असतो. चितळे बंधू कुटुंबातील सर्वांना ठरवलेली रक्कम मिळाल्यानंतर नफा पुन्हा व्यवसाय वृद्धीसाठी वापरतात. बाहेरची माणसं आणि पैशांना तर चितळे व्यवसायात अजिबात प्रवेश नाही. प्रारंभी जानकीबाईंनी दूध मोजून घेण्यापासून चक्का बांधायची कापडं साफ करण्यापर्यंत कित्येक कामं सांभाळली. जानकीबाईंचा हा वसा चितळे कुटुंबातील महिलांनीही सांभाळला. भिलवडीत पद्मजा परशुराम यांनी दुधाचे हिशेब, दर तासानं निघणारे टेम्पो, चक्का, खवा यांवर नजर ठेवतात. पुण्याला मंगलाताई, विजयाताई आणि सुनीताताई यांनी पूर्ण दर्जा नियंत्रण कित्येक वर्षे सांभाळलं. आज तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतल्या सुना उच्च शिक्षित आहेत. गरजेप्रमाणे लक्ष देतात. पण रोजची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. चितळेंचा हा वसा त्यांच्या कुटुंबाकडून कायमच पुढे चालत आलाय. त्यामुळे आजही चितळेंचं नाव आदरानं आणि मोठ्या अभिमानानं घेतलं जातं.

संबंधित बातम्या

ज्यांनी पहिल्यांदा अवकाश भ्रमंती करत जेफ बेजोसलाही मागे सोडले, कोण आहेत रिचर्ड ब्रॅन्सन?

D-Mart मध्ये स्वस्तात किराणा विकणारा श्रीमंत मालक, कोण आहेत राधाकृष्ण दमानी?

Success Story: अवघ्या 99 रुपयांत पँट विकणाऱ्या किशोर बियाणींनी 9000 कोटीचे पँटालून कसे बनवले? वाचा सविस्तर

कधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?

संन्यासी ते उद्योजक, योगाचे धडे ते तब्बल 2500 कोटींचे मालक, रामदेव बाबांची कहाणी

The business started from Bhilwadi spread all over Maharashtra, who is Bhaskar Chitale?

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.