Tax Notice | या कंपनीला मिळाली 6236 कोटींची टॅक्स नोटीस, शेअरमध्ये होऊ शकते पडझड

Tax Notice | या कंपनीने दोनच दिवसांपूर्वी नफ्यात 1.68% टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीला या आर्थिक वर्षात 69.4 कोटींचा नफा झाला. हा आनंद साजरा होत नाही तोच या कंपनीला 6236.81 कोटीच्या कराची नोटीस मिळाली. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का बसला. कंपनीच्या आनंदावर विरजण पडले. हा शेअर सध्या 0.85 टक्के घसरला आहे.

Tax Notice | या कंपनीला मिळाली 6236 कोटींची टॅक्स नोटीस, शेअरमध्ये होऊ शकते पडझड
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:12 PM

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : गेल्यावर्षी पेक्षा या कंपनीने यंदा चांगली कामगिरी बजावली. नफ्यात 1.68% टक्क्यांची वाढ नोंदवली. या कंपनीला गेल्या वर्षी 68.25 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर यंदा कंपनीने 69.4 कोटींचा नफा कमावला. पण हा आनंद दीर्घकाळ काही टिकला नाही. एका नोटीसने कंपनीच्या आनंदावर विरजण घातले. या कंपनीला जीएसटी कार्यालयाने 6236.81 कोटीच्या कराची नोटीस बजावली. या कंपनीचे बाजारातील भांडवल 3700 कोटी रुपये आहे. यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. या कंपनीच्या शेअरवर या वृत्ताचा परिणाम दिसून येऊ शकतो.

डेल्टा कॉर्पमध्ये भूंकप

ही कंपनी डेल्पा कॉर्प आहे. तिची उपकंपनी डेल्टा टेक गेमिंगला ही नोटीस मिळाली आहे. डेल्टा टेकला 6236.81 कोटी रुपयांची जीएसटीची मागणी करण्यात आली आहे. या वृत्ताचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर होण्याची शक्यता आहे. एका महिन्यात या कंपनीचा शेअर 21 टक्क्यांनी घसरला आहे. तर एका वर्षात कंपनीच्या शेअरने 40 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. शुक्रवारी या कंपनीचा शेअर घसरणीसह बंद झाला. हा शेअर 0.85 टक्के घसरला. हा शेअर शेवटच्या सत्रात 140 रुपयांवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

महसूल वधारला

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी बजावली. एकत्रित नफ्यात 1.75 टक्क्यांची वाढ झाली. 69.4 कोटी रुपयांवर नफा पोहचला. गेल्यावर्षीच्या या तिमाहीत हा आकडा 68.2 कोटी रुपये होता. या कंपनीचे वर्षाआधारित महसूल 270 कोटी रुपयांहून 271 कोटी रुपयांवर पोहचला. कंपनीच्या EBITDA मध्ये किंचित घसरण झाली. वार्षिक आधारावर 100.4 कोटींहून 100.3 कोटींवर घसरली. कंपनीने या घडामोडीत अनिल मलानी यांना चीफ फायनेन्शिअल ऑफिसर म्हणून तर मनोज जैन यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती दिली आहे.

काय आहे जीएसटीचा दावा

डेल्टा कॉर्प कंपनीने जीएसटीचा कमी भरणा केल्याचा दावा जीएसटी विभागाने केला आहे. कंपनीला वस्तू आणि सेवा करातंर्गत (GST) ही नोटीस बजावण्यात आली आहे. 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. डेल्टासोबत Dream 11 इतर कंपन्यांना पण जीएसटीची नोटीस बजावण्यात आली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.